IND vs NZ: सेमीफायनलपूर्वी कोच राहुल द्रविड एक्शन मोडमध्ये; मुंबईत पोहोचताच केलं 'हे' काम

IND vs NZ: वर्ल्डकप 2023 मध्ये भारतीय टीम सर्वात यशस्वी टीम आहे. स्पर्धेत भारत हा एकमेव संघ आहे ज्याचा एकाही सामन्यात पराभव झालेला नाही.

Nov 14, 2023, 09:19 AM IST
1/7

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची चांगली कामगिरी सुरु आहे. आता 15 नोव्हेंबर रोजी भारताला न्यूझीलंडविरूद्ध सेमीफायनल खेळायची आहे.

2/7

वनडे वर्ल्डकपमध्ये भारत पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडसमोर आला आहे. या सामन्यात भारतासमोर थोडा दबाव असण्याची शक्यता मानली जातेय.

3/7

सेमीफायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

4/7

द्रविड म्हणाले, आम्हाला कल्पना आहे की, ही एक महत्त्वाची आणि नॉकआउट मॅच आहे. या लढतीत काही प्रमाणात दबाव असेल हे देखील आम्हाला माहिती आहे. 

5/7

परंतु आतापर्यंत आम्ही ज्या पद्धतीने दबाव हाताळला आहे आणि त्याला उत्तर दिलंय ते पाहता आमचा आत्मविश्वास वाढेल, असंही राहुल द्रविड म्हणालेत. 

6/7

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी राहुल द्रविड अॅक्शन मोडमध्ये दिसून आले.

7/7

सेमीफायनलच्या सामन्यापूर्वी कोच राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी वानखेडेच्या खेळपट्टीची बारकाईने पाहणी केली.