टीम इंडियाच्या खेळाडूंचं जंगी सेलिब्रेशन, कुटुंबासोबत अशी साजरी केली दिवाळी... पाहा Photo

Team India Diwali : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. लीग स्पर्धेत नऊ सामने जिंकत टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सेमीफायनल आधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं.

| Nov 13, 2023, 18:22 PM IST
1/7

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. 15 तारखेला भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल खेळवली जाणार आहे. त्याआधी 12 तारखेला टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं.

2/7

बंगळुरुत एका हॉटेलमध्ये टीम इंडियासाठी दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवाळी पार्टीत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आपल्या कुटुंबासोबत सहभागी झाले होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्व खेळाडूंनी ट्रेडिशनल वेअर परिधान केलं आहे. 

3/7

बीसीसीआयने या पार्टिचा एक व्हिडिओ सोशलमीडियावरही शेअर केला आहे. या व्हिडिओत टीम इंडियाचे सर्व खेळाडू एन्जॉय करताना दिसतायत. शार्दुल ठाकूर आणि शुभमन गिलने एकाच रंगाचे सेम कुर्ते घातले होते. यावरुन ईशान किशनने दोघांची चांगलीच फिरकी घेतली. 

4/7

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पत्नी ऋतिका सजदेहसह सहभागी झाला होता. 

5/7

टीम इंडियाचं वेगवान त्रिकुट जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या पार्टीतही एकत्र दिसले. ट्रेडिशनला कपड्यात ते तिघंही खूपच छान दिसत होते.

6/7

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मानेही दिवाळी पार्टित सहभागी होत धमाल केली. ट्रेडिशनल लूकमध्ये विराट-अनुष्का पार्टिची शान बनले होते. 

7/7

टीम इंडियाचे युवा खेळाडू ईशन किशन, शुभमन गिल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजही दिवाळी पार्टीत सहभागी झाले होते.