जेठालालच्या मुलाने 'तारक मेहता' मालिका का सोडली? अनेक वर्षांनंतर त्याने सांगितले खरे कारण

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील जेठालालच्या मुलाने म्हणजेच टप्पूने मालिका का सोडली? अनेक वर्षांनंतर टप्पूने केला खुलासा. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Sep 04, 2024, 17:07 PM IST
1/7

मनोरंजन

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही एक प्रसिद्ध मालिका आहे. 16 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

2/7

टप्पूची भूमिका

भव्य गांधीने या मालिकेत जेठालाल यांच्या मुलाची (टप्पूची) भूमिका साकारली होती. 2008 मध्ये तो या मालिकेत सहभाही झाला होता. त्यानंतर त्याने 2017 मध्ये ही मालिका सोडली. 

3/7

भव्य गांधी

भव्यने 'तारक मेहता' मालिका सोडण्यामागचे खरे कारण सांगितले नाही. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच त्याने मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे. 

4/7

कारण

टेली टॉकला दिलेल्या मुलाखतीत त्याने मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे. आम्हाला पहिली गोष्ट हवी होती की टप्पूचे पात्र चांगले दिसावे. कारण टप्पू मोठा होत होता. 

5/7

तरुणपण

तो दाढी आणि मिशा वाढवत होता. निर्माते टप्पूचे तरुणपण लपवत होते. त्यांना वाटत होते की टप्पू आता टप्पूसारखा दिसत नाही. 

6/7

वैयक्तिक वाढ

तो म्हणाला की, आपण मोठे होत आहोत. त्याचप्रमाणे आपला प्रेक्षकवर्गही वाढत आहे. लोकांचे महाविद्यालयीन जीवन आणि आधुनिक समस्या दाखविल्या पाहिजेत. त्यानंतर निर्माते म्हणाले की, यावर विचार करतील. पण आता नाही. यासाठी दोन-तीन वर्षे लागतील. मला इतका वेळ घालवायचा नव्हता. कारण मला माझी वैयक्तिक वाढ बघायची होती.

7/7

9 वर्षांनंतर मालिका सोडली

त्यामुळे मी 'तारक मेहता' मालिका सोडली. तांत्रिकदृष्टया, मी प्रत्येकी 3 महिन्यांपैकी तीनदा नोटीस कालावधी पूर्ण केला होता. कारण मला शो सोडण्याची भीती वाटत होती. 9 वर्षांनंतर मी मालिका सोडली.