Eid 2023 : मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या; ईद निमित्ताने खरेदीसाठी 6 सर्वोत्तम ठिकाणे

Eid 2023 : सणासुदीत नेहमी मुंबईतील गजबजलेल्या दिसून येतात. मुंबईतील मुस्लिम बांधवांनी ईदची तयारी सुरु केली आहे. शहरातील लोकप्रिय बाजारपेठा खरेदीदारांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.  ईद-उल-फित्रचा पवित्र महिना म्हणून रमजान ओळखला जातो.  रमजान साजरा करण्यासाठी लोक नवीन कपडे, घराची सजावट, दागिने, खाद्यपदार्थ तसेच बरेच काही खरेदी करतात. मुंबईतील खरेदीच्या ठिकाणी आतापासूनच मोठी गर्दी पाहायला मिळात आहे. 

Surendra Gangan | Jun 28, 2023, 11:46 AM IST
1/6

झवेरी बाजार (Zaveri Bazaar)

झवेरी बाजार (Zaveri Bazaar)

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बाजारपेठ म्हणजे झवेरी बाजार. झवेरी बाजार हे मुंबईतील आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे लोक ईदच्या वेळी दागिने आणि पोशाख खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. तुम्ही सोने, चांदी आणि डायमंड ज्वेलरी तसेच अर्ध-मौल्यवान धातू आणि डायमंड यांची खरेदी केली जाते.

2/6

क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market)

क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market)

मुंबईतील सर्वात जुने आणि सर्वात गर्दीचे ठिकाण म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. ईदच्या काळात कपडे, दागिने, क्रॉकरी, सजावट, फळे, भाजीपाला आणि कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी करता येते. येथी मोठी ऑफरही मिळते.

3/6

मोहम्मद अली रोड (Mohammed Ali Road)

मोहम्मद अली रोड (Mohammed Ali Road)

तुम्हाला ईदसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी खरेदी करता येतात. खरेदी व्यतिरिक्त, तुम्ही गजबजलेल्या स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता आणि प्रसिद्ध मिनारा मशिदीला भेट देऊ शकता.

4/6

लिंकिंग रोड, वांद्रे (Linking Road, Bandra)

लिंकिंग रोड, वांद्रे (Linking Road, Bandra)

मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरातील एक लोकप्रिय रिटेल शॉपिंग स्पॉट. लिंकिंग रोड त्याच्या डिझायनर बुटीक आणि स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला येथे पारंपारिक आणि समकालीन कपडे आणि अॅक्सेसरीजची प्रचंड व्हरायडी मिळेल.

5/6

भेंडी बाजार (Bhendi Bazaar)

भेंडी बाजार (Bhendi Bazaar)

भेंडी बाजार हा कपड्यांसाठी ओळखला जातो.  ईदसाठी कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. उपकरणे आणि घरगुती वस्तूंसाठी आणखी एक लोकप्रिय खरेदी ठिकाण.क्रॉफर्ड मार्केटजवळील रस्त्यावर विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करणारी छोटी दुकाने आहेत. 

6/6

चोर बाजार (Chor Bazaar)

चोर बाजार (Chor Bazaar)

चोर बाजार नाव असूनही येथे खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. दक्षिण मुंबईतील चोर बाजार आता सर्वात गर्दीचे आणि सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. जिथे तुम्ही प्राचीन वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि बरेच काही खरेदी करू शकता.