IND vs PAK: वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमने थोपटले दंड, म्हणाला 'फरक पडत नाही तुम्ही...'

India vs Pakistan, ODI WC 2023: पाकिस्तानच्या बाबतीत मात्र नेहमीच वेगळी भूमिका घेतली जाते, असंही बाबर आझम म्हटला आहे.

Jul 07, 2023, 20:26 PM IST

Babar Azam On ODI WC 2023: पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 जुलैपासून तर दुसरा कसोटी सामना 24 जुलैपासून कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याने मोठं वक्तव्य केलंय.

1/5

... फरक पडत नाही

आम्ही कोणत्या संघाविरुद्ध कोणत्या मैदानावर खेळतो याकडे मला काही फरक पडत नाही. मला वाटतं की आम्ही केवळ भारताविरुद्धच खेळायला जात नाही तर तिथं विश्वचषक खेळायला जातोय, असं बाबर आझम म्हणतो.

2/5

लक्ष केवळ एका संघावर नाही...

आमचं लक्ष केवळ एका संघावर नाही, नऊ इतर संघांवर असणार आहे. आणखी संघ ज्यांना आम्ही पराभूत करून अंतिम फेरी गाठू शकतो, असा विश्वास बाबर आझमने व्यक्त केला आहे.

3/5

कुठंही खेळायला तयार

पाकिस्तानच्या बाबतीत मात्र नेहमीच वेगळी भूमिका घेतली जाते, असंही बाबर आझम म्हटला आहे. आम्ही कुठंही खेळायला तयार आहोत. आम्हाला प्रत्येक देशात प्रत्येक परिस्थितीत चांगली कामगिरी करायची आहे, असंही बाबरने बोलून दाखवलंय.

4/5

पीसीबीमध्ये काय चाललं?

पीसीबीमध्ये काय चाललं आहे याकडं आम्ही लक्ष देत नाही. आम्ही फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करतो. आमच्यासमोर आगामी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक आहे, असंही बाबर म्हणतो.

5/5

15 ऑक्टोबर 2023

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानचे संघ 15 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर समोरासमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे आता सर्वांना फक्त या सामन्याची प्रतिक्षा लागली आहे.