नशेत सलमान म्हणाला, 'शाहरुख फार..'; संतापलेल्या SRK ने, 'तुला इथेच..' म्हणत..; 'त्या' पार्टीत घडलं काय?

Baba Siddique Murder What Happened Between Salman Khan Shah Rukh Khan Infamous Fight: शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी दोघांच्याही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. मात्र शाहरुख आणि सलमानमध्ये नेमका वाद काय होता की ज्यामुळे या दोघांनी एकेकमांचं तोंडही पाहिलं नव्हतं जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Oct 14, 2024, 10:42 AM IST
1/14

salmanvssrkfight

बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर सलमान खान आणि शाहरुख खानमध्ये पॅचअप करणारा व्यक्ती गमावल्याबद्दल दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र सलमान आणि शाहरुखमध्ये नेमका काय वाद झालेला? जाणून घेऊयात...

2/14

salmanvssrkfight

शनिवारी मुंबईतील वांद्रे येथे बिश्नोई टोळीशी संबंधित गुंडांनी केलेल्या गोळीबारामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी गंभीर जखमी झाले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढळवून निघालं असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे आरोप प्रत्यारोप होत आहेत.  

3/14

salmanvssrkfight

बाबा सिद्दीकी हे मुंबईच्या राजकारणामधील मोठं नावं होतं. मुस्लीम समाजाचा नेता अशी ओळख असलेल्या सिद्दीकींचं मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांबरोबर अगदी घरोब्याचं नातं होतं. संजय दत्त आणि सलमान खान तर त्यांचे सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी येताच हे दोन्ही कलाकार अत्यंदर्शनसाठी लिलावतीमध्ये पोहोचले. सलमान बाबा सिद्दीकींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन पाणावलेल्या डोळ्यांनीच बाहेर पडल्याचं रविवारी दिसून आलं. 

4/14

salmanvssrkfight

बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीमध्येच सलमान खान आणि किंग खान शाहरुख या दोघांमधील वाद निवळला होता. दरवर्षी बाबा सिद्दीकी आलिशान इफ्तार पार्टीचं आयोजन करायचे. बाबा सिद्दीकी यांनी 2013 साली आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सलमान आणि शाहरुखमधील वाद मिटल्यानंतर दरवर्षी या इफ्तार पार्टीची जोरदार चर्चा असायची. मात्र शाहरुख आणि सलमानचा वाद मिटवणारा व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकीही या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.

5/14

salmanvssrkfight

बाबा सिद्दीकी यांनीही मी केवळ माध्यम होतो या दोघांमधील वाद मिटावा ही अल्लाहची म्हणजेच इश्वराची इच्छा होती अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. असं असलं तरी सलमान आणि शाहरुख यांच्यात असा काय वाद झाला होता की दोघांनी पाच वर्ष एकमेकांचा चेहराही पाहिला नव्हता. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

6/14

salmanvssrkfight

सलमान आणि शाहरुखमध्ये 2008 साली अभिनेत्री कटरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत वाद झाला होता. अनेक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सलमानने दारुच्या नशेत शाहरुख खानला टोमणा मारला होता.

7/14

salmanvssrkfight

शाहरुख खान त्यावेळी 'क्या आप पाचवी पास से तेज है?' या कार्यक्रमाचं होस्टींग करत होता. यावरुनच सलमानने या कार्यक्रमाचं नाव घेत शाहरुखला डिवचलं. सलमान शाहरुखला सर्वासमोर स्वार्थी म्हणाला.

8/14

salmanvssrkfight

"तू फार मतलबी माणूस आहेस. तू केवळ तुला गरज असते तेव्हा लोकांशी संपर्क साधतो. नंतर कधी समोरुन बोलतही नाहीस," असं सलमान शाहरुखला पार्टीत म्हणाल्याचं वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. 

9/14

salmanvssrkfight

खरं तर सलमान खान शाहरुखवर नाराज होता कारण शाहरुखने त्याला एका चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून सहभागी होण्यास नकार दिलेला. शाहरुखने 'मै और मिस खन्ना' या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी अशी सलमानची इच्छा होती मात्र शाहरुखने त्याला नकार दिलेला.

10/14

salmanvssrkfight

त्यापूर्वी सलमानने शाहरुखच्या मागणीला मान देत 'ओम शांती ओम'मध्ये पाहुणा कलाकार म्हणून गाण्यात काम केलेलं. तसेच शाहरुख खान 'कौन बनेगा करोडपती'चं होस्टींग करत होता तेव्हा कटरिनाबरोबर सलमान या कार्यक्रमात त्याच्या शब्दासाठी सहभागी झालेला. त्यामुळेच सलमानला शाहरुखने नंतर दिलेला नकार पचला नव्हता.

11/14

salmanvssrkfight

कटरीनाच्या बर्थ डे पार्टीमध्ये सलमानने 'क्या आप पाचवी पास से तेज है?'वरुन टोला लगावल्यानंतर शाहरुखनेही सलमानला 'दस का दम'वरुन टोमणा मारला. त्यावरुन सलमानने मी तुला बुक्का मारीन अशी धमकी दिली असला शाहरुखने सलमानला मी तुला तुझ्याच पार्टीत मारेन, असा इशारा दिला होता. 

12/14

salmanvssrkfight

मात्र गौरी खान या दोघांच्या मध्ये पडली आणि ती शाहरुखसहीत या पार्टीतून निघून गेली. त्यानंतर 2008 मध्ये सलमान विरुद्ध शाहरुख हा वाद शिगेला पोहचला होता. सलमानने शाहरुखने ऐश्वर्या रायचा अपमान केला होता असा दावाही केला. त्यावेळी ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनची पत्नी होती. यावर शाहरुख काही बोलला नव्हता.

13/14

salmanvssrkfight

मात्र 2008 मध्ये शाहरुखने सलमान हा लहान मुलासारखा वागतो असं म्हणत टीका केलेली. "मी बाप असल्यासारखा विचार करतो तर सलमान लहान मुलासारखा. आमच्यात कोणत्याही गोष्टीत सामन्य नाही. आम्ही वेगळा विचार करणारे, वेगळं बोलणारे आहोत. आम्ही एकत्र फार छान वेळ घालवला. मात्र आता त्या आठवणी झाल्या आहेत. आम्ही आपआपल्या जगात समाधानी आहोत. आम्ही एकत्र नाही हे चांगलं आहे. आम्ही आता मित्र नाही," असं शाहरुख म्हणालेला.

14/14

salmanvssrkfight

सलमान खान आणि शाहरुखने 17 एप्रिल 2013 रोजी बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत एकमेकांना कॅमेरासमोर आलिंगन देत या वादावर पडदा टाकला.