Holi 2024 होळीचा आनंद घेताना 'या' चुका टाळा , नाहीतर होतात 7 गंभीर परिणाम

वेगवेगळ्या रंगाने रंगून जाण्याचा सण म्हणजे होळी, मात्र आनंद साजरा करताना अति उत्साहात अनेकदा कळत नकळत खूप चुका होतात.  जाणून घेऊयात होळी खेळताना कोणत्या चुका करू नये. कधी माणसांच्या आनंदाला मर्यादेचं भान राहत नाही. त्यामुळे उत्साहाच्या भरात खूप चुका होतात.   

Mar 14, 2024, 13:48 PM IST
1/7

स्कीनची काळजी

होळी खेळण्याआधी त्वचेला तेल लावावं. त्यामुळे रंगांमध्ये असलेल्या केमिकलमुळे त्वचेला कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. 

2/7

नैसर्गिक रंगांचा वापर

होळी  खेळताना शक्य तितकं नैसर्गिक रंगांचा वापर करावा. काही जणांची त्वचा अतिसंवेदनशील असते. नैसर्गिक रंग वापरल्याने त्वचेला त्रास होत नाही.   

3/7

गोड खाण्यावर नियंत्रण

कोणत्याही सणाचं स्वागत हे गोड पदार्थांनी केलं जातं. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी रक्तातील साखर वाढू नये, याकरीता गोड खाण्यावर नियंत्रण ठेवावं.   

4/7

अंग झाकणारे कपडे वापरणं

होळी खेळताना पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरणं त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. रंगांमध्ये असलेल्या केमिकलचा डायरेक्ट संबंध हा त्वचेशी येतं नाही. म्हणून होळी खेळताना पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत. 

5/7

कोरड्या रंगांची होळी

गुळगुळीत लाद्यांवर पाणी सांडलेलं पाणी दिसत नाही. त्यामुळे होळी मोकळ्या जागेत खेळावी. शक्य असल्यास पाण्याची नासाडी न करता कोरड्या रंगांनी होळी खेळावी असं आवाहन शासनाकडून कायमच केलं जातं. 

6/7

प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर

लहान मुलं आणि मोठी माणसं ही होळी खेळताना प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या पिशव्यांमुळे पर्यावरणाला हानी होते. तसंच प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पाय घसरण्याची शक्यता असते. म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणं टाळावं. 

7/7

मुक्या प्राण्यांची काळजी घ्यावी

होळी खेळताना आनंदाच्या भरात बऱ्याचदा मुक्या प्राण्यांना त्रास होतो. मोठ्या आवाजात गाणी लावून नाचणं किंवा कुत्रे आणि मांजर यांच्या अंगावर पाण्याच्या पिशव्या फोडू नयेत. होळी साजरी अनेकदा कुत्रे आणि मांजरींना केमिकल रंगांमुळे त्यांना त्रास होईलं असं वागू नये. होळी हा आनंदाचा आणि रंगांचा सण आहे.त्यामुळे आपल्या आनंदामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची खबर घ्यावी.