'या' वेळी चहा पिणं म्हणजे आजाराला आमंत्रण, 99% लोक करतात ही चूक

भारतात अनेकजण चहाप्रेमी आहेत. चहाप्रेमी लोकांना दिवसभरातून कमीतकमी तीन ते चार वेळा चहा पिण्याची सवय असते. त्यातूनही सकाळी चहा प्यायली नाही तर त्यांना फ्रेश वाटत नाही. चहा शरीरात एनर्जी आणण्यासाठी महत्वाची असली तरी चुकीच्या वेळी चहा प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. 

| Jan 08, 2025, 14:49 PM IST
1/7

सकाळचा नाश्ता हा आरोग्यदायी जीवनासाठी अत्यंत महत्वाचा असतो. काहीजण चहाचे इतके शौकीन असतात की सकाळी उठल्याबरोबर त्यांना दुधाचा चहा प्यायला लागतो. भारतात बरेच चहाप्रेमी सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी किंवा नाश्ता केल्यावर चहा पितात. 

2/7

सकाळी रिकाम्यापोटी चहा पिणे हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकतं. सकाळी नाश्त्यात अनेकजण मसालेदार, तेलकट पदार्थ खातात त्यासोबतच चहाचे सुद्धा सेवन करतात त्यामुळे आरोग्याला होणारे नुकसान अधिक वाढते. 

3/7

रिकाम्यापोटी चहा पिणे वयोवृद्ध लोकांसाठी खूप घातक ठरू शकत. याचा हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यांना ऍसिडिटीचा त्रास देखील होऊ शकतो.    

4/7

चुकीच्या वेळी चहा प्यायल्याने कुपोषण होऊ शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही कोणत्याही अन्न पदार्थासोबत चहा प्यायली तर त्याचे पोषकतत्व शरीराला मिळत नाहीत. यामुळे अशक्तपणा, थकवा, दम लागणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. 

5/7

भारतात बरेचजण दुधाची चहा पितात. परंतु दुधाची चहा आरोग्यासाठी चांगली नसते. बरेचजण चहा बनवताना हीच चूक करतात परंतु दुधाची चहा प्यायल्याने शरीराला आयरन मिळत नाही आणि यामुळे एनीमियाचा धोका वाढतो.   

6/7

तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर दुधाच्या चहा ऐवजी तुम्ही तुळस, ग्रीन टी, हर्बल टी किंवा कॅमोमाइल टी सारख्या चहाचा आहारात समावेश करू शकता. यामुळे तुमची पचनक्रिया देखील चांगली राहते आणि इम्यूनिटी सुद्धा वाढते. 

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)