Photos: 24000 फुटांवर असताना उडालं विमानाचं छप्पर; तरीही वाचला सर्व प्रवाशांचा जीव कारण..

Miracle Landing Of Flight From 24000 Feet After Lost Roof : चमत्कारिकरित्या लोकांचा जीव वाचल्याच्या अनेक कथा तुम्ही कधी ना कधी ऐकल्या असतील. मात्र आज आपण ज्या घटनेबद्दल जाणून घेणार आहोत त्याबद्दल वाचल्यानंतर तुमचा त्यावर विश्वास बसणं कठीण आहे. विमान 24 हजार फुटांवर असतानाच काही तांत्रिक गडबड झाली तर प्रवासी म्हणून तुम्ही काय कराल? अर्थात पहिल्यांदा ऑक्सिजन मास्ककडे तुमचा हात जाईल. मात्र ऑक्सिजन मास्क ज्या विमानाच्या छताजवळून पडतं ते छतच उडून गेलेलं असेल तर? अशी घटना खरोखर घडली आहे. 

Swapnil Ghangale | Nov 22, 2023, 11:05 AM IST
1/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

एव्हिएशन इंड्स्ट्रीमधील चमत्कार - हवाईमधील अलोहा एअरलाइन्सची फ्लाइट 243 (Aloha Airlines Flight 243) च्या छप्पराचा काही भाग उडल्यानंतरही हे विमान सुरक्षितपणे जमीनीवर लॅण्ड करण्यात आलं. एव्हिएशन इंडस्ट्रीमधील अविश्वसनीय घटना आजही जगभरामध्ये एव्हिएशन इंड्स्ट्रीमधील चमत्कार म्हणून सांगितली जाते.

2/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

एकूण 95 जण विमानत होते - वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 28 एप्रिल 1988 रोजी 89 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स असलेल्या अलोहा एअरलाइन्सच्या विमानाच्या छताचा मोठा भाग उड्डाणादरम्यानच उडून गेला.

3/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

अचानक हवेचा दाब कमी झाला - 2 इंजिन आणि 110 आसनक्षमता असलेल्या बोइंग 737-200 जेट 40 मिनिटांच्या उड्डाणादरम्यान अर्ध्या वाटेत विमान हवेत असतानाच अचानक केबिनमधील हवेचा दाब कमी झाला. बोईंग 737 चं छप्पर तुटलं.

4/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

विमान 24 हजार फूट उंचीवर असताना छप्पर उडालं - विमानाच्या पुढील भागातील छप्पराचा मोठा तुकडा विमान पॅसिफिक महासागरावरुन जात असताना हवेत उडून गेला. पॅसिफिक महासागरापासून 24 हजार फूट उंचीवर असताना हा प्रकार घडला.

5/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

मोठा धक्का बसला अन्... - उड्डाण केल्यानंतर काही वेळात सर्वांना मोठा धक्का बसला. विमान पडतंय की काय असं वाटत असतानाच काही वेळानंतर प्रवाशांना विमानाच्या छताचा अर्धा भाग उडून गेल्याचं जाणवलं.

6/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

आरडाओरड सुरु झाला - विमानाच्या बॉडीला फ्यूसलेज असं म्हणतात. याचाच एक भाग हवेत उडून गेला. केवळ प्रवासीच नाही तर केबिन क्रू सुद्धा आरडाओरड करु लागले. आपण आता वाचणार नाही असं त्यांना वाटलं.

7/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

13 मिनिटांनंतर उतरलं विमान - वैमानिकांनी धीर सोडला नाही. त्यांनी हे तुटलेलं विमान 24 हजार फूटांवरुन खाली उतरवलं. जळणाऱ्या या इंजिनसहीत विमानाचं लॅण्डींग करण्यात आलं. विमानाचं छप्पर उडाल्यानंतर तब्बल 13 मिनिटांनंतर ते जमीनीवर लॅण्ड झालं.

8/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

अधिकारीही झाले थक्क - हे विमान जमीनीवर उतरलं तेव्हा त्याची परिस्थिती पाहून विमानतळावरील अधिकारीही थक्क झाले होते. आश्चर्यकारकरित्या या विमानातील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. विमानातील 95 जणांपैकी केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

9/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

एकमेव मृत्यू, तिचा मृतदेह कधीच सापडला नाही - या विमानातील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. या विमानाच्या एअरहोस्टेसचा मृत्यू झाला. प्रवाशांनी सीट बेल्ट बांधल्याने ते सीटवरच होते. मात्र या एअर होस्टेसचा मृतदेह कधीच सापडला नाही.

10/10

Miracle Landing Of Aloha Airlines Flight 243

इंडस्ट्री खडबडून जागी झाली - या घटनेनंतर संपूर्ण एव्हिएशन इंडस्ट्री खडबडून जागी झाली. या घटनेनंतर विमान उड्डाणासंदर्भातील सुरक्षेसंदर्भातील नियम अधिक कठोर करण्यात आले.