प्रतीक्षा संपली! Mahindra Thar Earth Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत

New Mahindra Thar Launched: कार असावी तर थार सारखी, महिंद्र कंपनीच्या थारची सध्या तरुणपिढीत चांगली क्रेझ आहे. महिंद्र थारला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हेच डोळ्यासमोर ठेऊन महिंद्रा कंपनीने थारचं नवीन एडिशन बाजारात आणलं आहे. 

| Feb 27, 2024, 21:19 PM IST
1/7

तरुणपिढीत थारची क्रेझ लक्षात घेऊन महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नवी थार लाँच केली आहे. Mahindra Thar Earth Edition असं या कारला नाव देण्यात आलं आहे. 

2/7

ग्राहकांना नव्या SUV मध्ये चार व्हेरिएंट पर्याय देण्यात आले आहेत. यात पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल ऑटोमॅटिक, डिझेल मॅन्युअल आणि डिझेल ऑटोमॅटिक मॉडेलचा समावेश आहे. 

3/7

नवीन महिंद्रा थार मॅट फिनिश डेजर्ट कलरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. एसयूव्हीमध्ये मॅट ब्लॅक बॅजसह सिल्व्हर फिनिश अलॉय व्हील आहेत. कारमध्ये एराथ एडिशन बॅजिंग देण्यात आलं आहे. एसयूव्हीच्या इंटिरिअरमध्ये ड्युअल टोन कलर स्कीम आहे. तसंच केबिनमध्ये डार्क क्रोम फिनिशिंग देण्यात आलं आहे. 

4/7

महिंद्रा थारच्या नवीन आवृत्तीमध्ये डेजर्ट टचसह, एसी व्हेंट्स, स्टीअरिंग व्हील आणि सेंटर कन्सोल देण्यात आलं आहे. नवीन थार स्पेशल एडिशनच्या प्रत्येक युनिटला एक यूनिक नंबर डेकोरेटिव्ह VIN प्लेट देण्यात आली आहे. 

5/7

थारच्या स्पेशल एडिशन मॉडल्समध्ये दोन इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी एक 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे आणि दुसरं 2.2 लीटर डिझेल इंजिन आहे. इंजिन सेटअपसह 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय थारसोबत अनेक ॲक्सेसरीजही घेता येतात. 

6/7

महिंद्रा थार अर्थ एडिशनची सुरुवात 15.40 लाख रुपयांपासून होते. पेट्रोल मॅन्युअलची ही किंमत आहे. पेट्रोल ऑटोमॅटिकची किंमत 16.99 लाख रुपये आहे. 

7/7

डिझेल मॅन्युअलची एक्स-शोरूम किंमत 16.15 लाख रुपये आहे. महिंद्रा थार अर्थ एडिशन, डिझेल ऑटोमॅटिकची किंमत 17.60 लाख रुपये, एक्स-शोरूम आहे.