Ashadhi Ekadashi: वारकऱ्यांचा रांगेतील त्रास थांबणार, सरकार 103 कोटी देणार, तिरुपतीप्रमाणे...; CM शिंदेंची घोषणा

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त सहकुटुंब महापुजेत सहभागी झाले. या सोहळ्यातील काही खास फोटो मुख्यमंत्र्यांनी शेअर केले आहेत. पाहूयात हेच फोटो आणि यावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले ते...

| Jul 17, 2024, 11:19 AM IST
1/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त केलेल्या शासकीय पुजेचे फोटो शेअर केले आहेत.  

2/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

यावेळी माझे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता, मुलगा श्रीकांत, सून वृषाली, नातू रुद्रांश उपस्थित होते, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे.   

3/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

शासकीय महापुजेच्या वेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर तसेच शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

4/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला.  

5/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

मानाच्या वारकऱ्यांबरोबर पूजा करण्याचे सौभाग्य मिळणे हा माझ्यासाठी बहुमान ठरला, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.   

6/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितले, असंही शिंदेंनी सांगितलं. 

7/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे असे मागणे मागितल्याचं शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.   

8/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

25 टक्के वारकरी जास्त आले आहेत. पाऊस चांगले झाल्याने गर्दी वाढली, असंही मुख्यमंत्री पुजेनंतर संवाद साधताना म्हणाले. सुगीचे सोन्याचे दिवस शेतकऱ्याच्या जीवनात येऊ दे, बळीराजा सुखी कर! शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे, असं मागणं मागितल्याचं शिंदेंनी पुजेनंतर बोलताना सांगितलं.

9/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

अति महत्त्वाच्या लोकांपेक्षा वारकऱ्यांना प्राधान्य देण्याचे काम केले. तीन मंत्री वारी नियोजनवर लक्ष देऊन होते. प्रशासनाने वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. पंढरपूरमध्ये अनेक कामे केली याचं समाधान असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

10/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पंढपूरचा विकास करू. कोणाला नाराज करणार नाही. सगळ्यांचे संमतीने काम करू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळेस बोलताना दिला. तिरूपती बालाजी धर्तीवर टोकण पद्धतीने दर्शन साठी शासन मदत करणार, अशी मोठी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. विठुरायाचे दर्शन आगामी काळात सुखकर होणार, रांगेतील त्रास थांबणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.   

11/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

1 हजार बेड हॉस्पिटल उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी भाषणात केली. पांडुरंग जसा दोन्ही हातांना देतो तसं आपलं सरकार सर्वांना दोन्ही हाताने देणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, मंदिर समिती कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबद्दल सकारात्मक विचार करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.

12/12

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos

तिरुपतीच्या धर्तीवर टोकण पद्धतीने दर्शनासाठी सरकार पंढरपूर मंदिर प्रशासनाला 103 कोटी रुपये देणार, असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.