Roman Winery: 1800 वर्ष जुनी रोमन वाईन फॅक्टरी; द्राक्षाच्या रसाचे कारंजे आणि बरचं काही

Roman Winery:  रोम शहराच्या बाहेर, क्विंटिलीच्या व्हिला येथे ही वाईन फॅक्टरी आहे. या उत्खननात अतिशय अनोख्या वाईन फॅक्टरी किंवा वाईनरीचे अवशेष सापडले आहेत.

Apr 19, 2023, 20:45 PM IST

1800 Year Old Roman Winery : मानव आपल्या गगनभेदी कामगिरीने भविष्याचा वेध घेत आहे. मात्र, इतिहासातील अनेक रहस्य विचार करायला भाग पाडत आहेत. उत्खननादरम्यान 1800 वर्ष जुनी रोमन वाईन फॅक्टरी आढळली आहे. ही वाईन फॅक्टरी संपूर्णपणे संगमरवरी बांधकाम असलेली आहे, विशेष म्हणजे येथे द्राक्षाच्या रसाचे कारंजे देखील पहायला मिळतात. 

1/8

24 हेक्टरचा प्राचीन रोमन व्हिला क्विंटिली बंधूंच्या मालकीचा असल्याचा इतिहास तज्ञ सांगतात. (Photo: S. Castellani)

2/8

द्राक्षाचा रस काढण्यासाठी  दोन मोठे यांत्रिक लीव्हर प्रेस देखील छायाचित्रांमध्ये पहायला मिळतात. (Photo: S. Castellani)

3/8

या वाईन फॅक्टरी परिसरात द्राक्षाच्या रसाचे कारंजे पहायला मिळतात.(Photo: S. Castellani)

4/8

1800 वर्ष जुनी रोमन वाईन फॅक्टरी सर्वात मोठी वाईन फॅक्टरी आहे. (Photo: S. Castellani)

5/8

द्राक्षाचा रस काढण्यासाठी  दोन मोठे यांत्रिक लीव्हर प्रेस देखील छायाचित्रांमध्ये पहायला मिळतात. (Photo: S. Castellani)

6/8

 वाइन आंबवण्यासाठी भुयारी तळघर देखील होते. (Photo: S. Castellani)

7/8

द्राक्षे साठवण्यासाठी येथे मोठी मोठी मातीची भांडी ठेवली होती. (Photo: S. Castellani)

8/8

वाईन फॅक्टरीत द्राक्षाच्या रस वाहून नेण्यासाठी मोठी पाईप लाईन बसवण्यात आल्याचे छायाचित्रांमध्ये पहायला मिळते. (Photo: S. Castellani)