अमिताभ बच्चन यांचे 'गॉडफादर', ज्यांना धर्मेंद्रही घाबरायचे, तर ते 'या' अभिनेत्याला देणार होते आनंद चित्रपटात राजेश खन्नाची भूमिका, पण...

Entertainment : धर्मेंद्र, अमिताभ बच्चन सारखे स्टार्स त्यांना घाबरायचे. तर यांच्यामुळे बिग बींना लागलेला 'अँग्री यंग मॅन' हे टॅग नाहीसा झाला. कोण आहेत ते दिग्दर्शक तुम्हाला माहितीयेत का?

Sep 30, 2024, 14:06 PM IST
1/7

'आनंद मरा नहीं…आनंद मरते नहीं है', आनंदमधील हा डायलॉग आणि बावर्चीमधील 'खुश रहना सरल है, लेकिन सरल होना मुश्किल है.' त्या काळात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हृषीकेश मुखर्जी यांच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. 

2/7

व्यावसायिक सिनेमा बनवण्यात हृषीकेश मुखर्जींचा हातखंड होता. धर्मेंद्र आणि अमिताभसारखे स्टार्स कोणाला घाबरत असतील तर ते हृषिकेश मुखर्जी होते. वाद केवळ त्यांच्या पात्रांचे शब्द नव्हते, तर अनेक कुटुंबे त्यांच्याशी जोडू शकली.

3/7

त्यांनी 42 चित्रपट दिग्दर्शित केले. ज्यात कथा कॉमन होती पण ट्रीटमेंट अतुलनीय होती. 30 सप्टेंबर 1922 रोजी जन्मलेले हृषिकेश मुखर्जी यांचा पडद्यावरची कोडी सहज सोडवण्याचं कसब होता. 

4/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आनंद या चित्रपटात राजेश खन्ना यांची भूमिका पहिले धर्मेंद्र यांना मिळणार होती. पण नंतर काही कारणाने ही भूमिका राजेश खन्ना यांना मिळाली. 

5/7

त्यानंतर संतप्त धर्मेंद्र यांनी दारुच्या नशेत ऋषी दा यांना फोन करुन त्रास दिला. त्यांना फोन करुन विचारलं की ही कथा मला सांगितली होती. मग ती राजेश खन्ना यांना का दिली? त्यावर ऋषी दा फोनवर म्हणाले, झोप जा धरम, झोप जा.

6/7

पण धर्मेंद्र यांनी ऋषी दा यांना रात्रभर त्यांना प्रश्न विचारून हैराण केलं. धर्मेंद्र यांनी ऋषी दासोबत सत्यकम आणि चुपके चुपके या चित्रपटात काम केलं. 

7/7

आनंद, मेम-दीदी, नौकरी, सत्यकाम, गुड्डी, बावर्ची, चुपके-चुपके, अर्जुन पंडित, गोलमाल, अभिमान, रंग बिरंगी, नमक हराम, आशीर्वाद आणि अनाडी. हिंदी चित्रपटांना साधे आणि लोकप्रिय बनवणाऱ्या हृषिकेश मुखर्जी यांचं 27 ऑगस्ट 2006 रोजी मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले.