अक्षय कुमारच्या 'या' गोष्टीमुळे रडली होती टीव्हीची 'नागिन', कारण ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री यांच्यामधील एका प्रँकची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्यामध्ये अभिनेत्री चित्रपटाच्या सेटवर रडली होती. 

Soneshwar Patil | Sep 27, 2024, 12:59 PM IST
1/7

बॉलिवूडमध्ये पदार्पण

टीव्हीची प्रसिद्ध नागिन जिने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबतच्या 'गोल्ड' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

2/7

अभिनेत्री रडली

या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये असेच काहीसे घडले. ज्यामुळे अभिनेत्री अक्षय कुमारवर रागावली आणि तिथेच ती मोठ्याने रडली. 

3/7

मौनी रॉय

या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव मौनी रॉय आहे. जी अभिनयासोबततच तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.   

4/7

नागिन मालिका

मौनी रॉयने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेत देखील तिने नागिनची भूमिका साकारली आहे. 

5/7

गोल्ड चित्रपट

अभिनेत्रीने अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटामध्ये एका अभिनेत्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या सेटवर अक्षयने मौनीसोबत एक प्रँक केला होता.

6/7

बीबीसी रिपोर्टर

चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमार बीबीसीचा रिपोर्टर बनून आला होता. अक्षयने मौनी रॉयची मुलाखत घेतली होती. अचानक मौनी रॉयला त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच वेळी अभिनेत्रीला शंका आली. 

7/7

मौनी रॉय नाराज

अभिनेत्रीला लगेच समजले की अक्षय कुमार रिपोर्टर बनून हा प्रँक करत आहे. त्यावेळी मौनी रॉय खूप चिडली होती. त्यावेळी ती अक्षयला म्हणाली होती की, मी तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही. त्यावेळी सेटवर असणारे लोक खूप हसू लागले.