बदलापुरच्या घनदाट जंगालातील वाघबीळ! धो धो कोसळणाऱ्या धबधब्याच्या मागे दडलीये रहस्यमयी गुहा

Waghbil Waterfall :  रहस्यमयी गुहा असलेला बदलापुरमधील अनोखा धबधबा.

वनिता कांबळे | Sep 26, 2024, 21:13 PM IST

 Badlapur Waghbil Waterfall : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला बदलापुरमधील  कोंडेश्वर धबधबा सर्वांनाचा माहित आहे. बदलापुरच्या घनादट जंगालात आणखी एक धबधबा आहे. हा धबधबा वाघबीळ नावाने ओळखला जातो. या धबधब्याजवळ एक रहस्यमयी गुहा आहे. जाणून घेऊया या धबधब्याजवळ जायचं कसं? जाणन घेऊया. 

1/8

बदलापूर... मुंबईपासून हाकेच्या अंतरावर छोटसं पण तितकचं सुदंर असं निसर्गरम्य शहर. इथचं वाघबीळ नावाची एक हिडन प्लेस आहे. 

2/8

 याच धबधब्याच्या मागे छोटीशी गुहा आहे.  या गुहेत धबधब्याचे तुषार अंगावर उडतात. गुहेत थंडगार वाटते. गुहेतून बाहरे पाहिल्यास अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळते. 

3/8

घनदाट जंगलातून वाट काढत काढत पुढे गेल्यावर उंच डोंगरावरुन कोसळणारा धबधबा नजरेस पडतो.   

4/8

वाघबीळ धबधबा पहायचा असेल तर सावरोली गावातून ट्रेक करावा लागतो. 

5/8

बदलापुरच्या घनादट जंगालातील वाघबीळ धबधबा मात्र, फार पर्यटकांमध्ये फारसा प्रसिद्ध नाही. यामुळे येथे मनाचा शोध घेता येईल इतकी शांतता अनुभवता येते.  

6/8

बदलापूर शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला हा कोंडेश्वर धबधबा देखील खूपच लोकप्रिय आहे. 

7/8

डोंगररांगानी वेढलेल्या बदलापूर शहराचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसते. बारवी धरण क्षेत्रात पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटतात.   

8/8

डोंगरकपारीतून वाहणारे झरे, हिरव्यागार वनराजीतून फेसाळत कोसळणारे धबधबे, हिरवी वस्त्रं परिधान केलेली भातशेतीची खाचरं, रिमझिम पावसातील धुक्‍याची दुलई आणि दुसरीकडे ताठ मानेनं डौलात उभी असलेली सह्याद्रीची पर्वतरांग, असा नैसर्गिक वारसा दिमाखात मिरवणारा असा हा बदलापुरचा परिसर पर्यटकांना आकर्षित करतोय.