'संकर्ष कऱ्हाडे भित्रा ससा...', मित्राविषयीच अभिजीत खांडेकर असं 'का' म्हणाला?

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अभिजीत खांडेकर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अभिजीत खांडेकरनं आतापर्यंत चित्रपट, मालिका आणि नाटक अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.  कोणत्याही प्रकारे अभिनय क्षेत्राशी कोणत्या प्रकारे संबंध नसताना त्यानं स्वत: चं एक स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, त्यानं हे सगळं कसं केलं अर्थात त्याता स्ट्रगलचा काळ कसा होता याविषयी अभिजीतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.   

Diksha Patil | Apr 28, 2024, 15:42 PM IST
1/7

अभिजीत खांडेकर

अभिजीत खांडेकरनं ही मुलाखत ‘गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले’ या युट्यूब चॅनलला दिली होती. 

2/7

रेडिओमध्ये जॉब

"माझं मासकॉम संपत आलेलं मी रेडिओमध्ये जॉब करत होतो. तिथून त्यांनी मला काढलं होतं आणि दोन महिन्यांचा पगार सुद्धा दिला नव्हता. आज अर्थात मला तिथेच मुलाखतीसाठी बोलावतात. त्याकाळात खूप धावपळ झाली." 

3/7

स्ट्रगलिंगच्या दिवसांची आठवण

अभिजीतनं त्याच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांची आठवण सांगत म्हटले की “महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेचा एक उत्तम अनुभव होता. सचिन गोस्वामी, सचिन मोटे हे आमचे स्कीट बसवायचे. महेश मांजरेकर, सुप्रिया पिळगांवकर हे परिक्षक होते. त्यामुळे त्यांच्या टीप्सपण खूप छान असायच्या."  

4/7

विनोद सगळ्यात अवघड

"त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपल्या मर्यादा काय आहेत. मी शिकलेला अभिनेता नाही. मला असा काही काम करण्याचा अनुभव अजिबात नव्हता. या स्पर्धेतला सगळ्यात कठीण किंवा अवघड गोष्ट म्हणजे विनोद आहे."   

5/7

इतर स्पर्धकांकडून शिकायला मिळालं

"निलेश साबळे, तोजपाल वाघ, निखिल राऊत यातल्या अनेकांनी आधीपासून खूप मोठी-मोठी काम केली त्यामुळे प्रत्येकाकडून शिकण्यासारख होतं.”

6/7

संकर्षण कऱ्हाडेविषयी मोठा खुलासा

अभिजीत संकर्षण कऱ्हाडेविषयी मोठा खुलासा करत म्हणाला की "त्यावेळी संकर्षण अगदी भित्रा ससा होता. आज तो जो काही झालाय त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आभाळ कोसळेलं की काय अशा घाबरणाऱ्या भित्र्या सशाची गोष्ट तो अक्षरशः तसा होता. तो कदाचित त्याच्या अभिनयाचा भाग ही असू शकतो. आमच्यात झालेला हा बदल त्याशोमुळे झाला."

7/7

अभिजीतचं काम

सध्या अभिजीत हा ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत गायिकेची भूमिका साकारत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x