थुलथुलीत पोटाने हैराण झालात? महिनाभर रोज प्या 'हा' ज्यूस, मेणासारखी वितळेल चरबी

Vegetable Juices For Weight Loss: चुकीची जीवनशैली आणि आहार यामुळे अनेकांना एक लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी 5 भाज्यांचा ज्यूस महत्त्वाचा. 

| Oct 14, 2024, 13:54 PM IST

दिवसेंदिवस लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. लठ्ठपणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या डोकं वर करतात. अशावेळी वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात काही भाज्यांचा समावेश करणे आवश्यक असते. आहारात 6 भाज्यांच्या ज्यूसचा करा समावेश. महिन्याभरात जाणवेल फरक.  

1/7

आवळ्याचा ज्यूस

वाढलेलं वजन कंट्रोल करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस शरीरासाठी फायदेशीर असते. आवळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात. तसेच यामुळे मेटाबॉलिज्म वाढते. पचनक्रिया सुधारल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

2/7

दिवसाची सुरुवात गरम पाण्याने करा

गरम पाण्याचे असंख्य फायदे आहेत. गरम पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय वाढतो. चयापचय थेट कॅलरी बर्नशी संबंधित आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, गरम पाण्याचे सेवन केल्याने चयापचय दर 30 टक्क्यांनी वाढतो. गरम पाण्याचे सेवन केल्याने बसून तुमचे वजन कमी होते. दिवसातून एक किंवा दोनदा गरम पाणी प्या आणि तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास सुरुवात होईल.

3/7

काकडीचा ज्यूस

काकडीच्या रसामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि 95% पाणी यासारखे आवश्यक पोषक घटक असतात. हे हायड्रेशन राखण्यात आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यात मदत करते. या रसामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करते आणि किडनीच्या कार्याला चालना देते.

4/7

पालक

पालकाच्या रसामध्ये भरपूर पोषक आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे त्वचेचे आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्याशी थेट संबंधित आहे. या पेयामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट जळजळ कमी करतात, तसेच ऑक्सिडेटिव्ह तणाव रोखून निरोगी त्वचेला प्रोत्साहन देतात.

5/7

टोमॅटो

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टोमॅटोच्या रसामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे पदार्थ असतात, जे स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरसारख्या डिजिटल उपकरणांच्या निळ्या प्रकाशापासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले लाइकोपीन एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

6/7

बीट

बीटरूट ज्यूस हे अतिशय आरोग्यदायी पेय आहे. यामध्ये फायबर, फोलेट, नायट्रेट आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे घटक असतात जे शरीराला पोषण देतात. ज्यांच्या उपस्थितीमुळे हृदयविकार टाळण्यास, पक्षाघाताचा धोका कमी करण्यास, शिरांमध्ये रक्त प्रवाह सुधारण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते.

7/7

गाजर

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात. याच्या रसामध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर अँटिऑक्सिडंट असतात. जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाच्या समस्या आणि एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करतात. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )