मालपोवा, फिरनी... यासारख्या लज्जतदार पदार्थांनी रमजानमध्ये सजतो मोहम्मद अली रोड
Ramdan 2024 : रमजानचा महिना सुरु होत आहे. या दिवसांमध्ये खवय्यांसाठी मोहम्मह अली रोडचा मार्ग लज्जतदार पदार्थांनी सजलेला असतो. त्याठिकाणी मिळणाऱ्या 15 पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत.
रमजानमध्ये उपवास करणे हा इस्लाममध्ये अतिशय पवित्र समजले जाते. मुस्लिम धार्मिक विधी त्यांच्या अध्यात्माशी पुन्हा जोडण्यासाठी पवित्र महिन्यात करतात. जगभरातील मुस्लिम लोक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. हा प्रार्थना, नम्रता आणि संयमाचा महिना आहे. पण खाद्यप्रेमींसाठी, हा एक असा काळ आहे जिथे 'इफ्तार' मेजवानीसाठी सर्वात स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. आणि त्याची चव चाखली जाते.
सूर्योदयापूर्वी जे जेवण केले जाते त्याला ‘सेहरी’ म्हणतात. दिवसभरात मात्र काही खाल्ले जात नाही. सूर्यास्त आणि प्रार्थनेनंतर, इफ्तारच्या मेजवानीने उपवास सोडला जातो ज्यामुळे कुटुंब एकत्र येऊन जेवण करतात.
मुंबईतील मोहम्मद अली रोड असंच एक ठिकाण आहे जिथे तुम्ही एकत्र येऊन वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल तर तेथे मिळणाऱ्या 15 खास पदार्थांपैकी जाणून घ्या. तसेच तेथे कसे पोहोचाल, ते देखील समजून घ्या?
मालपुवा-रबडी

दरवर्षी या ठिकाणाला भेट देण्याचे अनेकांचे एक मुख्य कारण म्हणजे मालपोवा-रबडी... मालपुवा हा पदार्थ गोड पदार्थातील सर्वोत्तम आहे. गोडातील पिवळ्या रंगाचा, तळलेला असा हा पदार्थ साखरेच्या पाकात भिजवला जातो. एवढंच नव्हे तर हा पदार्थ रबडी सोबत खाल्ला जातो. गव्हापासून तयार होणारा हा पदार्थ रमजानमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
नल्ली निहारी

मटण खीमा पाव

कबाब, चिकन टिक्का आणि तंदुरी चिकन

मावा जिलेबी

जिलेबी प्रेमी असाल तर मोहम्मद अली रोडवर बुरहानपूर मावा जिलेबी येथे मिळणारी मावा जिलेबी नक्की खा. मावा, अरारोट आणि दूध वापरून बनवलेले, जे त्यांना एक वेगळी, गोड चव देतात. बुरहानपूर मावा जिलेबीशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी जाऊ नका. या दुकानावरील चिन्हावर ‘मावा जलेबीचा राजा’ असे लिहिले आहे. येथे जाऊन जिलेबीचा आस्वाद घेतल्यावर हे खरं वाटेल.
फिरनी

मसाला मिल्क

नूर मोहम्मदी हॉटेलमध्ये संजू बाबा चिकन

या पदार्थाचा संबंध अभिनेता संजय दत्तसोबत आहे. नूर मोहम्मदी हॉटेल हे इथले सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्यांचे संजू बाबा चिकन. संजय दत्तच्या शहरातील आवडत्या ठिकाणांपैकी एक; 1986 पासून ते या रेस्टॉरंटला भेट देत आहेत. पूर्वी त्याने मालकांसोबत एक खास रेसिपी शेअर केली होती आणि ते त्याच्या नावावरून एक स्वादिष्ट चिकन करी तयार करण्यासाठी वापरत आहेत.
भेजा भ्राज

ताज आईसक्रिम

तंदूरी क्विल

गुरदा
