सॅमसंग, अॅपलला धोबीपछाड देत श्याओमी भारतात बनलं नंबर वन

चीनची हॅन्डसेट बनवणारी कंपनी श्याओमी या जानेवारीमध्ये भारतातील सर्वात वरच्या क्रमांकाची फोर जी हॅन्डसेट विक्रेता कंपनी बनलीय. 

Updated: Mar 17, 2015, 05:43 PM IST
सॅमसंग, अॅपलला धोबीपछाड देत श्याओमी भारतात बनलं नंबर वन title=

नवी दिल्ली : चीनची हॅन्डसेट बनवणारी कंपनी श्याओमी या जानेवारीमध्ये भारतातील सर्वात वरच्या क्रमांकाची फोर जी हॅन्डसेट विक्रेता कंपनी बनलीय. 

श्याओमीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मार्टफोन कंपनी सॅमसंग आणि अॅपलला मागे टाकलंय. हीच गोष्ट आज सायबर मीडिया रिसर्चच्या माध्यमातून समोर आलीय. 

मार्केट रिसर्च करणाऱ्या या कंपनीच्या म्हणण्यानुसार, आयफोन निर्माता कंपनी श्याओमी ऑक्टोबर-डिसेंबर २०१४ च्या दरम्यान देशात फोर जी एलटीई उपकरण विक्रेता कंपनी म्हणून समोर आलीय. 

सायबरमीडिया रिसर्चच्या ताज्या आकड्यांनुार, श्याओमी फोर जी एलटीई उपकरण बाजारातील ३०.८ टक्के हिस्सेसोबत जानेवारीमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर राहिली. यानंतर क्रमश: अॅपल (२३.८ टक्के), सॅमसंग (१२.१ टक्के), एचटीसी (१० टक्के) आणि मायक्रोमॅक्स (८.३ टक्के) यांचा क्रमांक लागलाय. 

ऑक्टोबर-डिसेंबर २०१४ च्या तिमाहीत १० लाखांहून अधिक फोर जी उपकरण भारतीय बाजारात आले. यामध्ये, स्मार्टफोन, टॅबलेट आणि डाटा कार्ड यांचा समावेश आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.