www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १८३७ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये टॉप मॅनेजमेंट मध्ये तसेच परदेशात काम करण्याची देखील संधी प्रोबेशनरी ऑफिसर्सना प्राप्त होते. सध्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरपर्सन अरूंधती भट्टाचार्य यांनी देखील करिअरची सुरुवात प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून केली. बँकिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोबेशनरी ऑफिसर्सची परीक्षा ही उत्तम संधी आहे.
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षामध्ये शिकणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा - किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षे (ओ.बी.सी.साठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे तर अनुसूचित जाती/जमातीसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे)
अटेंम्पट - खुल्या वर्गातील उमेदवारांना प्रोबेशनरी ऑफिसर्सची परीक्षा ४ वेळा देता येईल. ओ.बी.सी.उमेदवारांना ७ वेळी तर अनुसूचित जाती/जमातीसाठी कमाल वयोमर्यादेपर्यंत कितीही वेळा परीक्षा देता येईल.
वेतन - मूळ वेतन व सर्व भत्ते मिळून मुंबईमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सना वार्षिक ८ लाख ४० हजार इतका पगार मिळतो.
प्रवेश अर्ज - प्रवेश अर्ज www.statebankofindia.com किंवा www.sbi.co.in या वेबसाइटवरुन ऑनलाइन भरायचे आहेत. प्रवेश अर्ज फी उमेदवार ऑफलाइन पध्दतीने बँक चलनाद्वारे किंवा ऑनलाईन पध्दतीने डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग द्वारे भरू शकतात.
प्रवेश अर्ज ७ एप्रिल ते २५ एप्रिल २०१४ पर्यत भरता येतील.
लेखी परीक्षा जून महिन्यामध्ये घेण्यात येईल. परीक्षेच्या सविस्तर माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची वेबसाइट पहावी. महाराष्ट्रात लेखी परीक्षेचे केंद्र १७ जिल्ह्यामध्ये आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.