नवी दिल्ली : जर तुमचा पासवर्ड 123456, password, welcome, dragon, login, 12345678 या पैकी कोणता असले तर तो लगेच बदला. पासवर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅशडेटाने गेल्यावर्षी लीक झालेल्या मोस्ट पॉप्युलर पासवर्डची यादी जाहीर केलीये. यात 123456 हा पासवर्ड टॉपवर आहे.
कोणते पासवर्ड आहेत कॉमन
123456, 12345678, monkey, dragon, starwars आणि princess हे कॉमन पासवर्ड टॉप २५च्या यादीत सामाविष्ट आहेत. गेल्या वर्षी हे पासवर्ड सोप्या पद्धतीने लीक कऱण्यात आले.
तुम्हाला तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवायचा असेल तर या २५ पैकी पासवर्डचा वापर करु नका. स्प्लॅशडेटाने आठ डिजीट तसेच त्यापेक्षा अधिक डिजीटचा पासवर्ड वापरण्यास सांगितलेय. तसेच पासवर्डमध्ये विविध कॅरेक्टरर्स जसे लेटर्स, नंबर्स आणि सिम्बॉलचा वापर करण्याच्या सूचना दिल्यात.
गेल्या वर्षी लीक झालेले पासवर्ड
123456 , password , 12345678 , qwerty, 12345 , 123456789, football , 1234 , 1234567 , baseball , welcome, 1234567890, abc123, 111111, 1qaz2wsx, dragon, master, monkey, letmein, login , princess, qwertyuiop, solo, passw0rd, starwars