सावधान! स्मार्टफोनच्या बटनमध्ये असू शकतात बॅक्टेरिया

जर आपण स्मार्टफोन वापरत असाल तर सावध राहा. सरे महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावलाय. आपल्या स्मार्टफोनचं होम बटन म्हणजे बॅक्टेरियाचं घर असू शकतं, ज्यातील काही बॅक्टेरिया हे नुकसानदायक असू शकतात. 

Updated: Jan 21, 2015, 08:09 AM IST
सावधान! स्मार्टफोनच्या बटनमध्ये असू शकतात बॅक्टेरिया title=

लंडन: जर आपण स्मार्टफोन वापरत असाल तर सावध राहा. सरे महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावलाय. आपल्या स्मार्टफोनचं होम बटन म्हणजे बॅक्टेरियाचं घर असू शकतं, ज्यातील काही बॅक्टेरिया हे नुकसानदायक असू शकतात. 

वेबसाइट न्यूज डॉट को डॉट युकेच्या बातमीनुसार विद्यार्थ्यांना आढळलं की, आपला स्मार्टफोन फक्त त्याच बॅक्टेरियाचं घर नसतं तर अनेक लोकांकडून बॅक्टेरिया घेतात.

या संशोधनात सहभागी विद्यार्थ्यांनी स्मार्टफोन पेट्री डिशमध्ये टाकून पाहिला तर त्यात अनेक प्रकारांचे बॅक्टेरिया दिसले. सायमन पार्क जे की या संशोधनात सहभागी होते, त्यांचं म्हणणं आहे की, आपला फोन आपल्या पर्सनल टचचा पण रेकॉर्ड ठेवतो. सायमन म्हणाले, अधिक बॅक्टेरिया हे नुकसानकारक नसतात. मात्र काही मसलन स्टेफायलोकोकस सारखे बॅक्टेरिया नुकसान पोहोचवू शकतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.