मुंबई: व्हॉट्स अॅप सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि उपयोगी मोबाईल मॅसेज अॅप्लिकेशन आहे. मात्र याचा वापर करतांना अनेकदा आपण याचा साइड इफेक्ट्सशी लढतात आणि अनेकदा मशिनी अॅप आपल्याशी जिंकतं.
व्हॉट्स अॅप वापरण्याची अशी सवय लागलीय जी की जात नाही. यासाठी आम्ही खास आठ टिप्स सांगतोय. ज्याच्या मदतीनं आपण चांगल्या पद्धतीनं व्हॉट्स अॅपचा वापर करू शकाल.
१. मॅसेज वाचण्याची वेळ जाणून घ्या
ब्लू टिक आल्यापासून आपला मॅसेज पोहोचला हे कळतं. मात्र तो मॅसेज किती वाजता वाचला गेलाय हे पाहण्यासाठी मॅसेजवर टॅप केल्यास इन्फो आयकॉन येतं. त्यावर पाहिल्यास कोणी-किती वाजता आपला मॅसेज वाचलाय हे कळतं.
२. बल्कमध्ये मॅसेज पाठवा
आपण बल्क मॅसेज पाठवून आपला वेळ वाचवू शकतो. यासाठी ग्रृप बनवलाच पाहिजे असं नाही. ब्रॉडकास्ट हे फीचर आपण वापरू शकता. याद्वारे आपण एकच मॅसेज अनेक जणांना पाठवू शकता. मात्र हा मॅसेज रिसिव्ह करणाऱ्याला वाटेल की हा मॅसेज फक्त आपल्यालाच पाठवलाय. मेन्यू वर टॅप केल्यानंतर न्यू ब्रॉडकास्टवर क्लिक करता येईल. तसंच कुणी त्यावर रिप्लाय केला तर तो तुमच्याकडेच असेल.
३. डिलिट झालेले मॅसेज पुन्हा मिळवा
हे खूप कमी जणांना माहितीय की, व्हॉट्स अॅप दररोज सकाळी ४ वाजता व्हॉट्स अॅप मॅसेजचा बॅक अप करतो. त्यामुळं नुकताच डिलिट झालेला मॅसेज आपल्याला रिकव्हर करायचा असेल तर ते शक्य आहे. अॅप्लिकेशन अनइन्सॉल करून पुन्हा इंस्टॉल करा, मॅसेज परत मिळतील.
इन्स्टॉलेशन दरम्यान व्हॉट्स अॅप आपल्याला विचारेल की आपल्याला बॅकअप रिस्टोर करायचंय? याद्वारे आपण मागील सात दिवसांचं बॅकअप रिस्टोर होईल. याशिवाय Es File Explorer सारख्या अॅप्लिकेशनद्वारे जुने चॅट वापस मिळवू शकता.
४. कंप्युटरवर चालवा व्हॉट्स अॅप
जर आपण कंप्युटरवर गूगल क्रोम ब्राउजर वापरता तर व्हॉट्स अॅप web वर जावून इन्स्टक्शन फॉलो करा. आपला फोन इंटरनेटशी कनेक्ट किंवा वायफायशी कनेक्ट असेल तर आपल्या कंप्युटरवर व्हॉट्स अॅप सुरू होईल.
५. गॅलरीमध्ये लपवा व्हॉट्सअॅपचे फोटो
असं होऊ शकतं की, आपल्या व्हॉट्स अॅपचे फोटो आपण फोटो गॅलरीत ठेवू इच्छित नाहीत. तर अँड्रॉईड यूजर्ससाठी Es File Explorer अॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि नंतर sdcard/WhatsApp/Media पाथवर जावं आणि जे फोल्डर लपवायचं आहे त्याच्या खाली न्यू बटन वर टॅप करा. तिथं नवी फाईल तयार होईल ज्याचं नाव .nomedia ठेवा. यानंतर ते फोटो गॅलरीत दिसणार नाही.
६. चॅटचं शॉर्टकट
बस कोणत्याही चॅटवर क्लिक करा आणि पुन्हा पॉप-अप मेन्यूमध्ये Add Conversation shortcut सिलेक्ट करा. आपल्या होमस्क्रीन वर शॉर्टकट तयार होईल. एखाद्या आयकॉन प्रमाणे ते तुम्ही ड्रॅग करू शकाल.
७. ग्रृप चॅट नोटिफिकेशनला म्युट करा
ग्रृपवर होणाऱ्या चर्चेचा जर त्रास होत असेल तर आपण नोटिफिकेशन म्युट करू शकतो. यासाठी चॅट ओपन करा, मेन्यू बटनवर जा आणि म्यूट टॅप करा.
८. व्हॉट्स अॅप लॉक करा
अँड्रॉइडमध्ये 'अॅपलॉक' सारख्या अनेक अप्लिकेशन्स आहे. ज्याच्या मदतीनं व्हॉट्सअॅपसोबत अनेक अप्लिकेशनमध्ये पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक केलं जावू शकतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.