www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
माळशेज घाटात दरड कोसळलीय. त्यामुळे माळशेज घाट दोन तासाभरापासून बंद पडलाय. घाटातील वाहतूक ठप्प पडलेय. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे ही दरड दूर करण्यात मोठा अडथळा येत आहे.
माळशेजहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मुरबाड शहापूर रस्त्याने वळवण्यात आलीय. मुंबईहून माळशेजच्या दिशेने जाणा-यांनी पनवेल दिशेने जावं, अशी माहिती ट्रॅफीक पोलिसांनी दिलीय.
हा घाट बंद झाल्याने अहमदनगर-कल्याण मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. माळशेज घाटातील दरड दूर करण्यास दोन दिवस लागतील, असे महामार्ग प्रशासनाने स्पष्ट केलंय. त्यामुळे माळशेज घाटातून वाहतूक सुरू होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.
या घाटात पावसाळ्यात दरवर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे वाहनचालक, प्रवाशांचे म्हणणे आहे.
तर ठाणे बेलापूर रस्त्यावर गेल्या काही तासांपासून वाहतूक खोळंबलीय. ऐरोली ते महापे आणि पावणे ते घणसोली असं ट्रॅफीक जॅम झालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.