www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जपानच्या निसान अॅटोमोबाईल कंपनीची ‘डटसन गो’ ही छोटी हायटेक कार बुधवारी विक्रीसाठी हिंदुस्थानी बाजारात लॉन्च होणार आहे. तीन लाख रुपये किमतीची ती कार एक लिटर पेट्रोलमध्ये २० कि.मी. अंतराचे मायलेज देणार आहे.
मारुती सुजुकीच्या ऑल्टो कारला निसानची ‘डटसन गो’ ही कार टक्कर देणार आहे. ही कार आज १९ मार्चला भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहे. ही कार ऑल्टो आणि सेलेरियो या गाड्यांना चांगलीच टक्कर देऊ शकेल. याआधी ईओन या होंडाच्या गाडीने आपली जागा घेतली आहे. डटसन गो कार १२०० सीसी इंजिनची असून ती पेट्रोलवर असेल. या कारमध्ये मोबाईलवरील गाणी ऐकण्याची सुविधा देण्यात आली आहे.
डटसन गो भारतीय बाजारात शेवरले स्पार्क, मारुती सेलेरियो, मारुती ऑल्टो आणि हुंदाडई i10 आदी कारना स्पर्धा करेल. ऑटो एक्सपो २०१४ मध्ये ही कार प्रदर्शित करण्यात आली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.