www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जगातील सर्वात पातळ म्हणजे स्लीम फोन भारतात लॉन्च झाला. चीनची कंपनी जियोनीने गोवामध्ये या सुंदर फोनला बाजारात आणले. हा फोन आहे जियोनी ईलाइफ एस ५.५ याची किंमत २२ हजार ९९९ आहे.
बार्सिलोना येथे झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये फेब्रवारी महिन्यात प्रदर्शित झालेला जगातील सर्वात स्लीम फोन आता भारतात पुढील महिन्याच्या २७ तारखेला उपलब्ध होणार आहे.
फोनची वैशिष्ट्ये
- हा फोन खूपच पातळ मेटल फ्रेममध्ये बनविण्यात आला आहे.
- जाडी ५.५ मिमी आहे.
- वजन १३० ग्रॅम आहे.
- स्क्रिन ५ इंचाचा असून फोन फूल एचडी आहे. याचा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन आहे.
- 1.7 जीएचझेड मीडिया टेक एमटी ६५९२ ओक्टा कोर प्रोसेसरने चालते.
- यात १६ जीबी इंटरनेल स्टोअरेज क्षमता आहे.
- पण यात मायक्रो एसडी कार्डसाठी कोणताही सपोर्ट नाही.
- फोनमध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. यात एलईडी फ्लॅश आहे.
- याच्या समोर ५ मेगापिक्सल ९५ डिग्री अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे.
- सिंगल सीम फोन असून अँड्रॉइड ४.२ जेलीबीनवर आधारित आहे.
- याची बॅटरी २३०० एमएएच त्यामुळे जास्त टॉक टाइम देऊ शकते.
- यात ३ जी वायफाय, ब्ल्यू ट्यूथ ४.० आणि जीपीएस हे.
- हा फोन पांढरा, काळा, गुलाबी, निळा आणि वांगी कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.
- यापूर्वी व्हिवो X3 हा जगातील सर्वात स्लीम फोन होता. त्याची जाडी केवळ ५.७५ मीमी होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.