www.24taas.com, झी मीडिया, मुबंई
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार भरमसाठ बिल येणाऱ्या मोबाईलधारकांना थोडासा दिलासा देणार आहे. लवकरच मोबाईलधारकांच्या बिलांमध्ये २० ते २५ टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे.
टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांना स्वता:चे नेटवर्क उभारण्यात अमाप पैसे खर्च होतात. त्यामुळे `आभासी` ( `व्हर्च्युअल` ) नेटवर्कच्या मदतीने मोबाइल कंपन्या सेवा देणार आहेत.
`मोबाइल व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर्स`तील (एमव्हीएनओ) टेलिकॉम कंपनी दुसऱ्या कंपनीचे क्षमता असलेले जाळे (नेटवर्क कॅपॅसिटी) विकत घेते किंवा भाडेतत्वावर वापरते. नेटवर्क कॅपॅसिटीमधून ग्राहकांना `एअरटाइम` आणि `टॉक टाइम` टेरिफप्रमाणे मिळते.
या एमव्हीएनओद्वारे दुसऱ्या कंपनी नेटवर्कच्या मदतीने लोकल कॉलिग आणि डेटा कनेक्शनचे दर ५० टक्के घसरणार आहेत. तसेच इंटरनॅशनल कॉलिग दर २० ते ३० टक्क्यांनी घसरणार आहे. मात्र या कंपन्यांना सुरक्षा अणि नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.