बांगलादेशविरोधात भारताची प्रथम गोलंदाजी

बांगला देशात खेळल्या जाणाऱ्या टवेन्टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यात आज भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना रंगणार आहे.

Updated: Mar 28, 2014, 07:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ढाका
बांगला देशात खेळल्या जाणाऱ्या टवेन्टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यात आज भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना रंगणार आहे.
याच बरोबर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरोधात वेस्ट इंडिजचा सामना होणार आहे.
याआधी भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 7 विकेटने मात दिली होती. यानंतर या आधीचा चॅम्पियन वेस्ट इंडिजलाही हरवलं आहे.
आता बांगलादेशवर मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीचं तिकिट मिळवण्याची संधी भारताकडे आहे. कारण टीम इंडियानं या स्पर्धेत आपल्या पहिल्या दोन्ही साखळी सामन्यांमध्ये विजयाची नोंद केली होती.

अमित मिश्राचा फिरकी मारा या दोन्ही सामन्यात निर्णायक ठरला. तर रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ वाहतो आहे. मात्र युवराज सिंगच्या फॉर्मवर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजला हरवल्यानं धोनी ब्रिगेडचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकून भारत उपांत्य फेरीत धडक मारतो का?, यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.