वर्ल्डकप २०१५ : १०० रन्ससोबत हाशिम आमलानं तोडला वर्ल्डरेकॉर्ड!

क्रिकेट वर्ल्ड कपच्या पूल बीच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलानं आयर्लंडविरुद्ध दमदार ठो-ठो रन्स ठोकत वनडे करिअरमधलं २० वं शतक पूर्ण केलंय. डु प्लेसिससोबर त्यानं ही रेकॉर्डब्रेक भागीदारी केलीय. 

Updated: Mar 3, 2015, 12:02 PM IST
वर्ल्डकप २०१५ : १०० रन्ससोबत हाशिम आमलानं तोडला वर्ल्डरेकॉर्ड! title=

कॅनबेरा : क्रिकेट वर्ल्ड कपच्या पूल बीच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलानं आयर्लंडविरुद्ध दमदार ठो-ठो रन्स ठोकत वनडे करिअरमधलं २० वं शतक पूर्ण केलंय. डु प्लेसिससोबर त्यानं ही रेकॉर्डब्रेक भागीदारी केलीय. 

आमलानं १०० बॉल्समध्ये ९ फोर आणि २ सिक्स ठोकत आपली सेन्चुरी पूर्ण केलीय. यासोबतच, हाशिम आमला वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वात जलद २० सेन्चुरी ठोकणारा बॅटसमन ठरलाय.

या मॅचमध्ये, आमलानं १२८ बॉल्समध्ये १५९ रन्स ठोकलेत. तर डु प्लेसिसन १०९ बॉल्समध्ये १०९ रन्स ठोकून परतीचा मार्ग स्वीकारला.

आमला आणि डु प्लेसिस यांनी २६८ रन्सची भागीदारी केलीय. उल्लेखनीय म्हणजे, वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून ही दुसऱ्या विकेटसाठी झालेली सर्वात मोठी भागीदारी ठरलीय. यापूर्वी हा रेकॉर्ड एबी डिविलियर्स आणि जॅक्स कॅलिसनं (१९० रन्स) केला होता. 

यासोबतच, प्लेसिस या वर्ल्डकपमध्ये सर्वांत जास्त वेळा हाफ सेन्चुरी (५० रन्स) ठोकणारा बॅटसमनही ठरलाय. 

आयर्लंडची ही तिसरी मॅच आहे आणि या टूर्नामेंटमध्ये आत्तापर्यंत तरी या टीमला पराभवाचा सामना करावा लागलेला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.