चेन्नई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चेन्नईमध्ये झालेल्या चौथ्या वन डे सामन्यात भारतीय सुपरस्टार आणि उपकर्णधार विराट कोहलीने एक नवा इतिहास रचला आहे. कोहलीने आठ महिन्याच्या अंतरानंतर आपला २३ वे वन डे शतक झळकावरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक बनविण्यात वेस्ट इंडिजचा क्रिस गेल, श्रीलंकाच्या तिलकरत्ने दिलशान आणि भारताच्या सौरभ गांगुली यांना मागे टाकले आहे. तसेच पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
विराटने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध गुरूवारी चौथ्या वन डे सामान्यात शानदार शतक लगावले. १६५ सामन्यात त्याचे हे २३ वे शतक आहे. यापूर्वी गेलने २६९ सामन्यात, दिलशानने ३१९ सामन्यात आणि सौरभ गांगुली याने ३११ सामन्यात २२ शतक झळकावले आहेत.
बऱ्याच काळानंतर फॉर्ममध्ये आलेल्या विराटने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावून लय प्राप्त केली होती. विराट आता शतक बनविणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे चौथ्या स्थानावर श्रीलंकेचा कुमार संगकारा (४०४ सामन्यात २५ शतक), तिसऱ्या स्थानावर सनथ जयसुर्या ४४५ सामन्यात २८ शतक), दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग ३७५ सामने, ३० शतक) आणि सचिन तेंडुलकर ४६३ सामने ४९ शतक आहेत.)
विराटने आपले २२ शतक वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरोधात १५ फेब्रुवारी रोजी झळकावले होते. त्यावेळी त्याने १०७ धावांची खेळी केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.