अंपायरनंच घातलं हेल्मेट

Updated: Jan 21, 2016, 03:46 PM IST
अंपायरनंच घातलं हेल्मेट title=

क्रिकेटच्या मैदानात बॅट्समननं हेल्मेट घातल्याचं आपण नेहमीच पाहतो. पण बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरामध्ये झालेल्या वनडेमध्ये चक्क अंपायरच हेल्मेट घालून मैदानात उतरले. जॉन वॉर्ड असं या अंपायरचं नाव आहे. 

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये वॉर्ड तामिळनाडू विरुद्ध पंजाबच्या रणजी मॅचमध्ये अंपायर होते. त्यावेळी बरिंदर सरननं मारलेला स्ट्रेट ड्राईव्हचा बॉल वॉर्ड यांच्या डोक्याला लागला, ज्यात त्यांना दुखापत झाली, आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. या दुखापतीतून सावरल्यावर वॉर्ड हे पुन्हा एकदा अंपायरिंग करण्यासाठी कॅनबेरात उभे राहिले. पण यावेळी मात्र वॉर्ड यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता म्हणून ते हेल्मेट घालून या मॅचच्या अंपायरिंगसाठी मैदानात आले. 

2014मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्युज्सचा बॉल लागल्यानं मृत्यू झाला होता. त्यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ऑस्ट्रेलियाचे माजी अंपायर सायमन टॉफेल यांनीही अंपायरनी मैदानात हेल्मेट घालून उतरावं असा सल्ला दिला होता. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या केरळ विरुद्ध कर्नाटकच्या मॅचमध्ये अंपायर पश्चिम पाठक यांनीही हेल्मेट घातलं होतं.