मुंबई : 2011वर्ल्ड कप विजयाचा शिल्पकार ठरलेल्या युवराज सिंगची उणीव या वर्ल्ड कपमध्ये प्रकर्षाने जाणवेल, असं मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलय. दरम्यान टीम इंडियामध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता असल्याचा विश्वासही त्यांनी 'झी' समूहाचं वृत्तपत्र असलेल्या 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय.
वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरु झालंय. गतविजेती टीम इंडिया पुन्हा विजेतपदाला गवसणी घालणार का यावर चर्चा झडू लागल्या आहेत. 1983 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 1987 च्या वर्ल्ड कपचं विजेतेपदाचं आव्हान टीम इंडियासमोर होतं. अगदी तशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. 2011च्या वर्ल्ड कपमधील जवळपास अर्धी टीम या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही. युवा आणि काहीशी अनुनभवी टीम या वर्ल्डकपमध्ये उतरणार असल्याने वर्ल्ड कप टायटल डिफेंड करण्याचं आव्हान भारतासमोर असेल. विशेष म्हणजे 2011वर्ल्ड कपच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला युवराज सिंग या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्यानं त्याची उणीव भासेल, असं मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी झी समुहाचं वृत्तपत्र डीएनएच्या मुलाखातीत यांनी हे मत व्यक्त केलं.
2011वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगमुळे मिडल ऑर्डरला मजबुती मिळाली होती. मात्र, दुर्दैवाने आता त्याचा टीममध्ये समावेश नसल्याने त्याची उणीव प्रकर्षाने जाणवेल.
याचबरोबर बॉलिंग डिपार्टमेंटदेखील टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब आहे. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय बॉलर्स पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. बॉलिंग ही भारताची कमकुवत बाजू आहे. असं असलं तरी, बॉलिंग सुधारण्यासाठी आपल्याकडे अवधी आहे. ट्राय सीरिजनंतर प्रॅक्टिस मॅचही आहेत. यामध्ये भारताला आपली कमकुवत बाजू सुधारण्यावर भर देता येईल. भारतीय टीमचं कॉम्बिनेश हे सर्वोत्तम आहे. मात्र, आपल्याकडे बॉलिंगमध्ये अतिशय कमी पर्याय आहेत.
तर सध्या खराब फॉर्ममधून जात असलेला शिखर धवन हादेखील वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करेल असा विश्वास वेंगसरकर यांना वाटतोय. धोनी एँड कंपनी सध्या जरी खराब कामगिरी करत असले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सीरिज जरी गमावली असली तरी धोनी ब्रिगेडमध्ये वर्ल्ड कप टायटल डिफेंड करण्याची क्षमता असल्याचं मतही वेंगसरकर यांनी व्यक्त केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.