अंडर 19 क्रिकेट टीमचे ट्रेनर राजेश सावंत यांचा संशयास्पद मृत्यू

अंडर 19 क्रिकेट टीमचे ट्रेनर राजेश सावंत यांचा दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आला आहे.

Updated: Jan 29, 2017, 04:53 PM IST
अंडर 19 क्रिकेट टीमचे ट्रेनर राजेश सावंत यांचा संशयास्पद मृत्यू

मुंबई : अंडर 19 क्रिकेट टीमचे ट्रेनर राजेश सावंत यांचा दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आला आहे. अंडर 19ची टीम सरावासाठी पोहोचली असताना राजेश टीमबरोबर नसल्याचं लक्षात आलं. हॉटेलच्या रूममध्ये पाहाणी केली असता राजेश बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

चाळीस वर्षांचे सावंत याआधी अफगाणिस्तानच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. राजेश सावंत इंग्लंड इलेव्हन विरुद्ध या महिन्यात झालेल्या भारत ए टीमचाही भाग होते.

हार्ट अॅटेकमुळे राजेश सावंत यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी पोस्टमॉर्टमनंतरच मृत्यूचं खरं कारण कळेल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. भारताच्या अंडर 19 टीमला सोमवारपासून वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडच्या अंडर 19 टीमबरोबर 50 ओव्हरच्या पाच मॅच आणि दोन चार दिवसांच्या मॅच खेळायच्या आहेत.