जयवर्धनेकडून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

श्रीलंकन टीमचा माजी कर्णधार जयवर्धनेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Updated: Jul 15, 2014, 04:15 PM IST
जयवर्धनेकडून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा title=

कोलंबो : श्रीलंकन टीमचा माजी कर्णधार जयवर्धनेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोमवारी एक प्रसिद्धी पत्रक काढून जयवर्धनेच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीची माहिती दिलीय.

बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरोधातील आगामी कसोटी मालिकेनंतर जयवर्धने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.

जयवर्धनेने 1997 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला, यानंतर 145 कसोटी सामने खेळून 50.18 च्या सरासरीने 11 हजार 493 रन्स केल्या. जयवर्धनेने एकूण 33 शतकं काढली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.