सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती, १९वं ग्रँडस्लॅम!

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलं. सेरेनाचं करिअरमधील हे १९वे ग्रँडस्लॅम असून तिनं सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

AFP | Updated: Jan 31, 2015, 08:12 PM IST
सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती, १९वं ग्रँडस्लॅम! title=

मेलबर्न: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलं. सेरेनाचं करिअरमधील हे १९वे ग्रँडस्लॅम असून तिनं सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

शनिवारी रंगलेल्या या सामन्यात सेरेनाने मारियाचा ६-३, ७-६ (७/५) असा पराभव करत विजेतेपद पटकावलं. 

सेमी फायनलमध्ये मारिया शारापोव्हानं एकातोरिना माकारोव्हाचा तर सेरेना विल्यम्सनं मॅडिसन किजचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळं आजची अंतिम लढत अतिशय रंगतदार ठरली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.