तिसऱ्या कसोटीसाठी वृद्धीमान सहाच्या जागी पार्थिव पटेल

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी वृद्धिमान साहाच्या जागी पार्थिव पटेलची निवड करण्यात आलीये.

Updated: Nov 23, 2016, 10:58 AM IST
तिसऱ्या कसोटीसाठी वृद्धीमान सहाच्या जागी पार्थिव पटेल title=

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी वृद्धिमान साहाच्या जागी पार्थिव पटेलची निवड करण्यात आलीये.

वृद्धिमान सहा दुखापतीमुळे या कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी पार्थिव पटेलची निवड कऱण्यात आलीये. तब्बल 9 वर्षानंतर पार्थिव पटेलचा कसोटी संघात समावेश करण्यात आलाय. 

पार्थिवने आतापर्यंत 20 कसोटी सामने खेळलेत. यात त्याने 683 धावा केल्यात. आठ वर्षानंतर तो कसोटीत खेळणार आहे. तसेच 2012नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेला नाही. 

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने शिल्लक आहेत. या मालिकेत भारताने 1-0ने आघाडी घेतलीये.