रॉबिन उथप्पाची काहीच चूक नाही - कॅप्टन गंभीर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा क्रिकेटर सरफराज खान याच्यासोबत कथित स्वरुपात झालेल्या वादामुळे टीकेचा धनी ठरला तो रॉबिन उथप्पा... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या या सलामी बॅटसमनचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलाय तो या टीमचा कॅप्टन गौतम गंभीर... आयपीएलसारख्या टूर्नामेंटमध्ये अशा घटना घडतच असतात, असं गंभीरनं म्हटलंय. 

Updated: Apr 14, 2015, 05:59 PM IST
रॉबिन उथप्पाची काहीच चूक नाही - कॅप्टन गंभीर title=

कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा क्रिकेटर सरफराज खान याच्यासोबत कथित स्वरुपात झालेल्या वादामुळे टीकेचा धनी ठरला तो रॉबिन उथप्पा... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या या सलामी बॅटसमनचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलाय तो या टीमचा कॅप्टन गौतम गंभीर... आयपीएलसारख्या टूर्नामेंटमध्ये अशा घटना घडतच असतात, असं गंभीरनं म्हटलंय. 

यामध्ये काहीही चुकीचं नव्हतं. तुम्हाला खेळाडुंची आक्रमकता पाहायची असते आणि हो योग्यच आहे. मीदेखील मैदानावर खूप आक्रमक असतो. मॅच जिंकण्यासाठीच खेळली जाते आणि त्यासाठी आक्रमकता आवश्यक आहे, असं म्हणतानाच मीडियानं या गोष्टीला जास्त हवा देऊ नये, असंही गंभीरनं म्हटलंय. 

अशा गोष्टी घडतच असतात... त्यांना जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. अशा अनेक गोष्टी घडतात आणि मीडियाकडून त्यांना अनावश्यक महत्त्व मिळतं, असंही गंभीर म्हणतोय. गंभीरनं एका प्रचार कार्यक्रमा दरम्यान हे वक्तव्य केलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, केकेआरचा सलामी बॅटसमन उथप्पाची कथित स्वरुपात आरसीबीचा १७ वर्षीय खेळाडू सरफराजशी वाद झाला आणि या दरम्यान उथप्पानं सरफराजची कॉलरही पकडली. त्यानंतर, आरसीबीचे एबी डिविलियर्स आणि अशोक डिंडा मध्ये पडले... 

यानंतर, उथप्पानं आपल्या वर्तनासाठी माफिही मागितल्याची माहिती मिळतेय. मात्र, आयपीएलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी मात्र अशा कोणत्याही घटनेची आपल्याला माहिती नसल्याची भूमिका घेतलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.