नवी दिल्ली : सौरव गांगुलीनं भारतीय टीमचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यावर पलटवार केलाय.
भारतीय टीमच्या कोचपदासाठी मुंबईकरांनी मुलाखतीवेळी थायलंडला फिरण्यापेक्षा स्वत: हजर असायला हवं होतं, असं रवी शास्त्री यांच्या मुलाखतीवेळी गैरहजर राहिलेल्या सौरवनं म्हटलंय.
जर रवी शास्त्री यांना आपली निवड न होण्यामागे केवळ एका सदस्याचा हात आहे असं वाटत असेल तर त्यांच्या मनाचे खेळ आहेत, असं सौरवनं म्हटंलय.
'पुढच्या वेळी अशी एखादी बैठक असेल तर उपस्थित राहा, असा सल्ला त्यांनी मला दिलाय... पण, माझ्याकडेही त्यांच्यासाठी एक सल्ला आहे. जेव्हा तुम्ही इंडियन टीमच्या कोच पदासाठी मुलाखत देत असाल तेव्हा तुम्ही बँकॉकमध्ये सुट्ट्या घालवण्याऐवजी समितीसमोर प्रेझेंटेशनसहीत उपस्थित राहायला हवं...' असंही सौरवनं म्हटलंय.
टीम इंडियाच्या कोच निवड समितीच्या सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि सौरव गांगुली या तीन सदस्यांनी या पदासाठी अनिल कुंबळेची निवड केली. त्यामुळे रवी शास्त्री नाराज आहेत. 'मी कोच पदावर असू नये, अशी गांगुलीची इच्छा होती' असंही रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं.