पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा धावांचा डोंगर, भारताला विजयासाठी हव्या 351 रन

पुण्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे.

Updated: Jan 15, 2017, 05:11 PM IST
पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा धावांचा डोंगर, भारताला विजयासाठी हव्या 351 रन

पुणे : पुण्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे. 50 ओव्हरमध्ये इंग्लंडनं 7 विकेटच्या मोबदल्यात 350 रन बनवल्या. इंग्लंडकडून रूट 78, रॉय 73 आणि बेन स्टोक्सनं 62 रन बनवल्या.

टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय कॅप्टन विराट कोहलीनं घेतला पण भारतीय बॉलर्सना यश मिळवताना नाकी नऊ आले. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर जडेजा आणि उमेश यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.