रायपूर : अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत वर्ल्ड हॉकी लीग फायनलमध्ये कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.तब्बल ३ वर्षांनी भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवण्याची किमया साधली.
निर्धारित वेळेतील लढत बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूट आऊटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मोक्याच्या क्षणी भारताने बाजी मारली आणि कांस्यपदक मिळवले. नेदरलँडविरुद्धचा सामना ५-५ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूट आऊट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यात भारताने ३-२ अशी बाजी मारली.
सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताची सुुरवात धीमी झाली. मात्र दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक पवित्रा घेताना भारताने दमदार पुनरागमन केले. अखेर निर्धारित वेळेत दोन्ही संघांना ५-५ बरोबरीत समाधान मानावे लागले. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्येही भारताला सुरुवातीचे दोन गोल करता आले नाही. मात्र त्यानंतर सलग तीन गोल करत भारताने सामन्यात विजय मिळवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.