मुंबई : मेलबर्नवर खेळण्यात आलेल्या बॉक्सिंग टेस्टमध्ये भारताने मॅच ड्रॉ केली आणि भारताला सिरीजमध्ये पराभवाचा सामना कारावा लागला. भारतीय क्रिकेट रसिकांना टेस्ट सिरीज गमावल्याचे दुःख असताना कर्णदार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
टेस्ट क्रिकेटला अलविदा करणारा महेंद्र सिंग धोनीवर परदेशी जमिनीवर टीम इंडियाच्या खराब कामगिरीबद्दल गेल्या काही काळापासून टीकेची झोड उठवली गेली असली तरी तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. याची साक्ष स्वतः आकडे देतात....
भारतीय कर्णधार | मॅच | विजय | पराभव | ड्रॉ | विजय % |
एम एस धोनी | 60 | 27 | 18 | 15 | 45.00 |
सौरव गांगुली | 49 | 21 | 13 | 15 | 42.85 |
मो अजहरूद्दीन | 47 | 14 | 14 | 19 | 29.78 |
सुनील गावस्कर | 47 | 9 | 8 | 30 | 19.14 |
नवाब पतोडी | 40 | 9 | 19 | 12 | 22.50 |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.