ढाका : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर आणि यूएई संघाचा सध्याचा प्रशिक्षक आकिब जावेद याने भारताचा बॉलर जसप्रीत बुमरा याच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'बुमराला जखमी न होता खेळणं कठीण आहे,' असं तो म्हणाला.
'बुमरा ज्यापद्धतीने बॉलिंग करतो ते पाहता १० वर्ष तो कोणत्याही जखमेशिवाय खेळू शकेल असं मला वाटत नाही. त्याच्या बॉलिंगच्या पद्धतीमुळे त्याच्या पाठीवर एक प्रकारचा ताण येतो. त्यामुळे त्याला शरीराच्या आतल्या भागात जखम होऊ शकते. मी काही ज्योतिषी नाही. पण, मला असं वाटतं,' असं तो म्हणाला.
तसंच बांग्लादेशचे बॉलर्स तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर रेहमानही त्याला जास्त 'टॅलेंटेड' वाटतात असंही तो म्हणाला. त्यांचे वय बुमरापेक्षा कमी आहे. पण, त्यांच्या बॉलिंगचा स्पीड पाहता ते बुमरापेक्षा सरस असल्याचं वक्तव्य त्याने केलं आहे.