सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या एका महिला क्रिकेटपटूवर बंदी लावण्यात आली आहे. पायपा क्लीअरी हिच्यावर सट्टेबाजी केल्यामुळे ६ महिन्यांदी बंदी घालण्यात आली.
गेल्या नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या कसोटीवर तिने 15.50 ऑस्ट्रेलियन डॉलरचा सट्टा लावला. तिने तशी कबुली दिली. ती 19 वर्षांची आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पुरुष संघांची कसोटी मालिका नुकतीच झाली.
महिला टी-20 मध्ये सुद्धा 'बीग बॅश लीग' होते. त्यात ती 'पर्थ स्कॉर्चर्स'कडून खेळते. कारवाईच्या स्वरुपानुसार 18 महिन्यांची प्रलंबित बंदी आहे. अशी कारवाई झालेली ती ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे.
२०१५ च्या पुरुष क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर तिने नऊ डॉलरचा सट्टा लावला होता. यापूर्वी 'सिडनी सिक्सर्स'ची लेगस्पीनर अँजेला रिक्स हिच्यावर दोन वर्षांची प्रलंबित बंदी घालण्यात आली.