अल्बी मॉर्केलचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड, पोलार्डला टाकले मागे

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर काल झालेल्या चेन्नई विरूद्ध दिल्ली सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या अॅल्बी मॉर्केल याने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक टी-२० मॅचेस खेळण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. 

Updated: Apr 10, 2015, 07:30 PM IST
अल्बी मॉर्केलचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड, पोलार्डला टाकले मागे title=

चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर काल झालेल्या चेन्नई विरूद्ध दिल्ली सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या अॅल्बी मॉर्केल याने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक टी-२० मॅचेस खेळण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. 

अॅल्बी मॉर्केलने २६८ टी-२० सामने खेळले आहेत. यापूर्वी तो किरॉन पोलार्डसह २६७ सामने खेळून बरोबरी केली होती. 

मॉर्केल आणि पोलार्डनंतर डेव्हिड हसी २४३, रायन डेन डन्सकार्टे २४०, ब्रॅड हॉग २३३, ड्वेन ब्राव्हो २२९, ड्रिक नॅनिज २१५, अल्फान्सो थॉमस २१४, ल्यूक राइट २१४, अझर महेमूद २१३ आणि ओवेस शाह २१३, यांचां क्रमांक लागतो. या यादीत कोणत्याही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. भारतीय खेळाडू इतर कोणत्याही देशातील टी-२० सामने खेळत नाही. 

भारतीयांमध्ये सर्वाधिक टी-२० सामने खेळणाऱ्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी १९२, रोहित शर्मा १८७, सुरेश रैना, १८७, रोहीत शर्मा १८७, युसूफ पठाण  १७६, गौतम गंभीर १७५, हरभजनसिंग १७३, रॉ़बिन उथप्पा १६४, दिनेश कार्तिक १६१ आणि विराट कोहली १५७. 

Most T20 matches

 PLayer

M

R

W

C

अॅल्बी मॉर्केल

268

3,483

208

53

किरॉन पोलार्ड

267

5,031

190

149

डेव्हिड हसी

248

5,822

67

121

रायन डेन डन्सकार्टे

240

4,931

94

88

ब्रॅड हॉग

233

6,363

63

91

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.