'...पण मी अजूनही रुबेलवर प्रेम करते'

बांग्लादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप लावणारी बांग्लादेशची अभिनेत्री नाजनीन अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधील विजयाचा हिरो ठरलेल्या रूबेलवरील बलात्काराचे आरोप नाजनीननं परत घेतले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना नाजनीननं सांगितलं की,'रुबेलनं माझी फसवणूक केली, पण अजूनही माझं त्याच्यावर प्रेम आहे.'

Updated: Mar 17, 2015, 09:29 AM IST
'...पण मी अजूनही रुबेलवर प्रेम करते' title=

मेलबर्न: बांग्लादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप लावणारी बांग्लादेशची अभिनेत्री नाजनीन अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधील विजयाचा हिरो ठरलेल्या रूबेलवरील बलात्काराचे आरोप नाजनीननं परत घेतले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना नाजनीननं सांगितलं की,'रुबेलनं माझी फसवणूक केली, पण अजूनही माझं त्याच्यावर प्रेम आहे.'

२५ वर्षीय रुबेलनं लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप १९ वर्षीय नाजनीन अख्तर हॅपीनं लावला होता. या आरोपानंतर रुबेलचं करिअर संकटात सापडलं होतं. ढाकातील कोर्टानं त्याला रिमांडमध्ये पाठवलं होतं. 

त्यानंतर बांग्लादेश क्रिकेट टीमच्या मुख्य सदस्य असल्यानं आणि देशाचं हित पाहून वर्ल्डकप संपेपर्यंत रुबेलची जामीनावर सुटका करण्यात आली. 

अॅडलेडमध्ये रुबेलनं इंग्लंडविरुद्ध ५३ रन्स देत ४ विकेट घेतल्या होत्या. या मॅचमुळे बांग्लादेश पहिल्यांदा वर्ल्डकप क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचलाय.

एका चॅनेलसोबत बोलतांना नाजनीन म्हणाली, मी त्याला माफ केलंय. त्यानं माझी फसवणूक केली पण माझं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.