www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महिन्याभरात दुधाच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गायीच्या आणि म्हशीच्या दुधात लीटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ही दरवाढ लागू असेल असं दूध उत्पादक संघानं स्पष्ट केल आहे.
२१ डिसेंबरपासून नवे दर लागू होतील. खासगी आणि सहकारी दूध उत्पादक संघाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे गायीच्या दुधाचा दर ३५ वरून ३७ रुपये प्रति लीटर तर म्हशीच्या दुधाचा दर ४४वरून ४६ रुपये लीटर होणार आहे.
खासगी आणि सहकारी दूध महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या गायीचे दूध ३६ रुपये प्रतिलीटर असून विक्रीदरात वाढ झाल्याने ते आता ३८ रुपये प्रतिलीटर मिळेल. तर सध्या ४४ रुपये प्रतिलिटरने मिळणारे म्हशीचे दूध वाढलेल्या दरानुसार यापुढे ४६ रुपये लिटर मिळणार आहे.
यापूर्वी २५ नोव्हेंबरला दरवाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी खासगी संस्थांनी सप्टेंबरमध्ये दरवाढ केली होती. या दरवाढीने सरकारी डेअरीकडे येणारे दूध कमी झाले होते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सरकारनेही दूध दरवाढ केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.