मुंबई : नाराज काँग्रेस नेते नारायण राणे वेट अॅड वॉचच्या भूमिकेत आहेत. राणे आता आपली भूमिका पुढील आठवड्यात जाहीर करणार आहेत. पुढील आठवड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांशीं चर्चा करुन ते पुढील रणनीती जाहीर करणार आहेत.
चर्चा करुन नियुक्त्या करण्याची प्रथा काँग्रेसमध्ये नसेल तर ती त्यांनी पाडावी, असंही राणेंनी म्हटलय. राणे चीन दौ-यावर जात असून तिथून परतल्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
दरम्यान राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाले आहेत. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण य़ांनी राणेंशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी राणेंनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. त्यामुळं राणेंचं बंड शमवण्यात पुन्हा अशोक चव्हाणांना यश येणार का हा सवाल आहे. तर संजय निरुपम यांनीही राणेंची भेट घेण्याकरता वेळ मागितली आहे. दरम्यान याबाबत पत्रकारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना छेडलं असता, उद्धव यांनी नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.