पंतप्रधान मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौ-यावर येत आहेत. या दौ-यात पंतप्रधान मोदी रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलचं उदघाटन करतील.

Updated: Oct 25, 2014, 12:27 PM IST
पंतप्रधान मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौ-यावर येत आहेत. या दौ-यात पंतप्रधान मोदी रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलचं उदघाटन करतील.

सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरचं मोदी उदघाटन करतील. नव्वद वर्षानंतर हे हॉस्पिटल रिलायन्स पुन्हा नव्यानं उभारलंय. 348 बेड्सची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलचं पंतप्रधान आज संध्याकाळी उदघाटन करतील.

या दौ-यात पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार का याकडेही सा-यांच्या नजरा लागल्यात. दिवाळी सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आज पत्रकारांसाठी मीडिया मिलन कार्यक्रमाचं आयोजन केले होते. नवी दिल्लीतील भाजपमुख्यालयात यावेळी पंतप्रधान पत्रकारांशी चर्चा केली. या कार्यक्रमात तब्बल साडेपाचशे पत्रकार सहभागी झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.