घाटकोपर स्टेशनवर प्रवासी संख्येत वाढ

मेट्रो रेल्वे सुरु झाल्यापासून घाटकोपर मेट्रो स्टेशनमधून प्रवास करणा-या  प्रवाश्यांच्या संखेत वाढ झाली आहे. 

Updated: May 10, 2016, 10:47 AM IST
घाटकोपर स्टेशनवर प्रवासी संख्येत वाढ

मुंबई : मेट्रो रेल्वे सुरु झाल्यापासून घाटकोपर मेट्रो स्टेशनमधून प्रवास करणा-या  प्रवाश्यांच्या संखेत वाढ झाली आहे. 

मेट्रोमुळे पश्चिम उपनगरांमध्ये जाणा-यांची सोय झाली आहे. मात्र त्यामुळे मध्ये रेल्वेच्या घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची संख्या वाढली असून या स्टेशनवर चढ,उतर करण्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे.. 

सकाळी तसेच संध्याकाळी घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची संख्या जास्त असते. या गर्दीच्या वेळेत कुर्ला - कल्याण दरम्यान दोन्ही दिशेनं लोकल ट्रेन चालवल्यास प्रवाशांची सुविधी होईल. तशी मागणी प्रवाशांकडून होवू लागली आहे. 

सध्या केवळ  दोन लोकल ट्रेन विद्याविहार येथून चालवल्या जात असून त्यांची वेळ अयोग्य असल्याची तक्रार प्रवाशांनी केलीय.