मुंबई : यंदा मान्सून लवकर भारतीय किनारपट्टीवर धडकण्याची चिन्ह आहेत. मान्सूनचं 30 मे रोजी केरळ किनारपट्टीवर आगमन होण्यार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून आठवडाभर लवकर येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आलीय. त्यामुळं शेतक-यांना खरीप पिकांच्या लागवडीसाठी मशागतीची कामं लवकर आटोपावी लागतील.
तसेच मान्सून 30 मेला केरळ किनारपट्टीवर म्हणजेच 6 दिवस आधीच सक्रिय होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटलेय.